आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:प्रवाशांचे 28.19 लाखांचे सामान परत; आरपीएफची कारवाई

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे सुरक्षा बलाचे अर्थात आरपीएफ कर्मचाऱ्यांनी रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त, ऑपरेशन ‘अमानत' या अंतर्गत गरजू प्रवाशांना मदत करीत त्यांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, मोबाइल फोन, लॅपटॉप, दागिने, रोख इ. यासारख्या मौल्यवान वस्तू प्रवाशांना परत मिळवून दिल्या आहेत.

त्यात भुसावळ मंडळाअंतर्गत २८.१९ लाखांचे सामान प्रवाशांना परत देण्यात आले आहे.चालू वर्षाच्या जानेवारी ते जून २०२२ दरम्यान, ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत, आरपीएफने मध्य रेल्वे मंडळाअंतर्गत सुमारे १.८९ कोटीचे सामान परत करून प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. एकूण ६८९ प्रवाशांपैकी ३५४ प्रवाशांचे १.१७ कोटी रुपयांचे सामान एकट्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात परत मिळवण्यात आले. या सामान पुनर्प्राप्ती प्रकरणांमध्ये बॅग, मोबाइल फोन, पर्स, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. तर भुसावळ विभागातील १४३ प्रवाशांचे रु.२८.१९ लाखांचे सामान प्रवाशांना परत देण्यात आले आहे.

याशिवाय नागपूर विभागात ८१ प्रवाशांचे रू. १९.१४ लाखांचे सामान, पुणे विभाग ७३ प्रवाशांचे रु. १५.०४ लाखांचे सामान, सोलापूर विभागातील ३८ प्रवाशांचे रु.९.३८ लाखांचे सामान परत दिले आहे. मुख्य म्हणजे वर्ष २०२१ मध्ये देखील मध्य रेल्वे आरपीएफने १.६५ कोटीच्या ६६६ प्रवाशांचे सामान परत मिळवले आहे. यापैकी ३८३ प्रवाशांचे १.०१ कोटींचे साहित्य मुंबई विभागातूनच वसूल केले.

रेल्वे सुरक्षा दलाच्या या कर्मचाऱ्यांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीला अडथळा आदी विविध सुरक्षा आव्हानांनाही तोंड द्यावे लागते. रेल्वे संरक्षण दलाच्या या शूर सैनिकांच्या कार्याचा सारांश सुरक्षा, सतर्कता आणि सेवा असे करता येईल आणि त्यांनी अत्यंत समर्पण सतर्कतेने आणि धैर्याने आपली कर्तव्ये पार पाडली आहेत.

बातम्या आणखी आहेत...