आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक प्रकल्पात अत्यल्प जलसाठा:अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्पात 28.81 तर वान मध्ये 36.07 दलघमी जलसाठा दोन लघु प्रकल्प कोरडे

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात 28.81 दलघमी तर वान प्रकल्पात 36.07 दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षाच्या तुलनेने यावेळी मे महिन्यात हा कमी आहे. दरम्यान दोन लघु प्रकल्प कोरडे पडले असून अन्य लघु प्रकल्पातही आता अत्यल्प जलसाठा राहिला आहे.

जिल्ह्यात दोन मोठे, तीन मध्यम आणि 23 लघु प्रकल्प अकोला पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येतात. मागील वर्षी नोव्हेंबर पर्यत जोरदार पाऊस झाल्याने जवळपास सर्वच लघु प्रकल्प ओसंडू वाहिले. मोठ्या आणि मध्यम प्रकल्पाचे अनेकवेळा दरवाजे उघडावे लागले. त्यामुळे 5 मे रोजी रोजी मोठ्या आणि मध्यम प्रकल्पात समाधानकारक जलसाठा आहे. परंतु अलनिनोमुळे पाऊस कमी अथवा विलंबाने झाल्यास पाणी टंचाईचा सामना काही प्रमाणात करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेने पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे.

दोन लघू प्रकल्प कोरडे

बार्शिटाकळी तालुक्यातील जनुना आणि मोऱ्हळ हे दोन लघु प्रकल्प कोरडे पडले असून याच तालुक्यातील पिंपळगाव चां., इसापूर, घोटा या प्रकल्पात 5 टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे. त्यामुळे या लघु प्रकल्प परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवू शकते. त्याच बरोबर आता अन्य लघु प्रकल्पातही जलसाठ्याची पातळी कमी होत चालली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेने जलसाठा कमी

मागील वर्षी 5 मे रोजी काटेपूर्णा प्रकल्पात 33.71 दलघमी तर वान प्रकल्पात 40.96 दलघमी जलसाठा उपलब्ध होता. या तुलनेने या वर्षी या दोन्ही प्रकल्पात जलसाठा कमी आहे.

प्रकल्प - साठवण क्षमता - जलसाठा - टक्केवारी

काटेपूर्णा - 86.35 दलघमी - 28.81 दलघमी -33.36 टक्के

- वान - 81.95 दलघमी - 36.07 दलघमी - 44.01 टक्के

मोर्णा - 41.46 दलघमी - 18.12 दलघमी - 43.70 टक्के

निर्गुणा - 28.85 दलघमी - 6.97 दलघमी - 24.16 टक्के

उमा - 11.86 दलघमी - 1.58- दलघमी - 13.54 टक्के