आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान आवास योजनेत मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या मेळाव्याला आणखी तीन दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान दोन दिवस चाललेल्या या मेळाव्यात एकुण 501 घरकुल लाभार्थ्यांनी भेट दिली. या दोन दिवसात 208 घरकुलांच्या बांधकामाचे नकाशे मंजूर करण्यात आले तर 122 लाभार्थ्यांचे गुंठेवारी नियमानुकुलची प्रकरणे मार्गी लावण्यात आली. तसेच 134 लाभार्थ्यंानी कागदपत्रांची पूर्तता केली. मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेवून या मेळाव्याला आणखी तीन दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 7 हजार 640 घरकुले मंजूर झालेली आहेत. यापैकी 1 हजार 927 घरकुलांची कामे सुरु आहेत. मंजूर लाभार्थ्यांमध्ये गुंठेवारी पद्धतीच्या लाभधारकांचाही समावेश आहे. काही लाभधारकांनी गुंठेवारीचे नियमानुकुलही मंजूर झालेले आहेत. मात्र बांधकामाचा नकाशा विविध कागदपत्रांची पूर्तता न केल्याने मंजूर झालेला नाही. त्यामुळे हजारो लाभार्थ्याचे घरकुलाचे बांधकाम रखडले आहे.
या अनुषंगानेच महापालिकेत शुक्रवार दि. 3 आणि शनिवार दि. 4 रोजी घरकुल लाभार्थ्यांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास लाभार्थ्यांनी उर्त्स्फुत प्रतिसाद दिला. मेळाव्यात घरकुलाच्या बांधकामाचे नकाशे मंजूर करण्यात आले. तसेच गुंठेवारीचे नियमानुकुलही मंजूर करण्यात आले. याच बरोबर 196 लाभार्थ्यांनी रखडलेल्या घरकुलाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मेळाव्यात नपा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, नगररचना विभागाचे सहा.नगररचनाकार संदीप गावंडे, कनिष्ठ अभियंता मनोज घाटोळकर, धनंजय तराळे, निशा निकामे, लक्ष्मीकांत बांगर, प्रधानमंत्री आवास योजना कक्षाचे श्रीकांत माणिकराव, विशाल गवई, प्रितम बारगीर, शुन्य कंसलटंसीचे मनीष भुतडा, अभियंता अजिंक्य कराळे, मुकेश जोगे, योगेश हिरूळर, संजय राठी आदी उपस्थित होते.
तीन दिवसाची मुदतवाढ
मेळाव्यात दोन दिवसात घरकुल लाभार्थ्यांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेवून प्रशासनाने सोमवार दि. 6, मंगळवार दि. 7 आणि बुधवार दि. 8 अशी तीन दिवसाची मुदतवाढ दिली आहे. घरकुल लाभार्थ्यांनी या मेळाव्यात हजेरी लावून घरकुला बाबतच्या त्रुट्यांची पूर्तता करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.