आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीचा दुसरा डोस:तीन लाख 51 हजार लाभार्थ्यांचा काेराेना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस बाकी

अकाेला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात कोरोनाचे संकट नियंत्रणात असले तरी गेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ दिसत आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. मात्र लसीकरणाकडे लोक पाठ फिरवत असून, दिवसाला १० ते २० डोसेसच्या दरम्यान लसीकरण होत आहे. पहिला डोस घेतलेल्या लाभार्भ्यांपैकी तीन लाख ५१ हजार लाभार्थ्यांचा दुसरा डोस बाकी आहे.

जिल्ह्यात दहा दिवसात कोरोनाचे ३५ रुग्ण आढळले असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात असली तरी धोका टळला नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. कोविड संसर्गाचे स्वरुप सौम्य झाले असले तरी ज्यांनी दूर्धर आजार आहे, किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे. अशांनी लस घ्यावी, असे डाॅक्टरांकडून सांगण्यात येते.

मात्र शहरी, ग्रामीण भागात लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने केंद्र बंद करावी लागली आहेत. सध्या कोविड संसर्ग नसला तरी प्रवास किंवा गर्दीच्या ठिकाणी ज्या ज्येष्ठ नागरिकांना जावे लागते त्यांनी बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन करण्यात येते. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ९ हजार ३३० लाभार्थ्यांनी बुस्टर डोस घेतले आहेत.

जिल्ह्यातील स्थिती
जिल्ह्यातील आतापर्यंतची स्थिती पाहिली तर १२ लाख ३७ ६७४ लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे. यातील ८ लाख ८६ हजार ११२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर ३ लाख ५१ हजार लाभार्थ्यांचा दुसरा डोस बाकी आहे.

बातम्या आणखी आहेत...