आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा खरीपनंतर रब्बी हंगामातही शेतकरी आत्महत्या सुरूच असून, आॅक्टाेबर आणि नाेव्हेंबर या दाेन महिन्यात ३० शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याचे समाेर आले आहे. खरीप आणि रब्बीमध्ये मिळून आतापर्यंत ७४ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. अतिवृष्टी व संततधार पावसामुळे २ लाख १६ हजार ९८८ हेक्टर क्षेत्रावरील िपकांची हानी झाली आहे. मात्र या हानीची पूर्ण भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही, हे वास्तव या पार्श्वभूमीवर प्रकर्षाने पुढे आले आहे.
रब्बी हंगाम सध्या सुरू असून, पेरणीही आटाेपली आहे. मात्र येथून पुढे रब्बी हंगामातील िपके जगवण्यासाठी पैसे काेठून आणावे , असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. जून ते आॅगस्ट या दरम्यान झालेल्या नुकसानापाेटी मदतीच्या िवतरणाची टक्केवारी ७४.६६ पर्यंत पाेहाेचली आहे. मात्र सप्टेंबर व आॅक्टाेंबर महिन्यातील नुकसान भरपाईची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे. त्यामुळे ही मदत तातडीने देण्याची मागणी हाेत आहे.
अशी आहे टक्केवारी
जून ते आॅगस्ट या दरम्यान झालेल्या नुकसानापाेटी आतापर्यंत ९६ हजार ८२१ शेतकऱ्यांना १०० काेटी २७ लाखांचे िवतरण झाले आहे. त्यानुसार आतापर्यंत अकोला तालुक्यातील ६६.२७ टक्के, बार्शीटाकळी तालुक्यातील ४६.५९, अकोट ७५.९१, तेल्हारा ८२.६१, बाळापूर ८७.४२, मूर्तिजापूर ७७.८३ तर पातूर तालुक्यात ९२.२७ टक्के. एकूण जिल्ह्यात सरासरी ७४.६६टक्के मदतीचे िवतरण संबंधित शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
खरिपातील नुकसान असे
जून, जुलै व आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे ९८ हजार ३२१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तसेच १ हजार ७२४ हेक्टर जमीन खरडून गेली.
जिल्ह्यात १२ ते २१ सप्टेंबर दरम्यान ३६ हजार २७२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.
ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व संततधार पावसाने ८० हजार ६७१ हेक्टरवरील िपकांचे नुकसान झाले असून, नुकसान भरपाईसाठी ११९ काेटी ६२ लाख २९ हजारांचा निधी अपेक्षित आहेत.
मदतीसाठीचे चित्र
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना राज्य शासनाकडून आर्थिक आणि अन्य मदत िमळते. यासाठी िजल्हास्तरीय समितीच्या बैठकीत सर्व प्रकरणांवर चर्चा करून िनर्णय घेण्यात येताे.
जून ते नाेव्हेंबर या सहा महिन्यात एकूण १७ प्रकरणे पात्र ठरवण्यात आली केवळ एकच प्रकरण अपात्र ठरवण्यात आले.खरीप आणि रब्बी हंगामात आतापर्यंत ५६ प्रकरणांमध्ये चाैकशी सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.