आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पातूर वनपरिक्षेत्रातून 30 सागवान नग जप्त:वन विभागाची मध्यरात्री कारवाई; अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

19 नोव्हेंबरच्या रात्री मिळालेल्या गुप्त माहितीवरून आलेगाव व पातूर वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी संयुक्त कार्यवाही करत सातमाथा बीट वनक्षेत्रामध्ये रात्री पाळत ठेवून चोरट्यांकडून 30 सागवान व 2 सायकल असा एकूण अंदाजे 55 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

आलेगाव वनपरिक्षेत्रातील सातमाथा कॅम्प भागात 7 ते 8 सागवान चोर सायकल सहित पातूर येथून आलेगाव वनक्षेत्रात घुसल्याची गुप्त माहिती शनिवारी रात्री वन विभागाला मिळाली. त्यानंतर विश्वनाथ चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी आलेगाव व धीरज मदने वनपरिक्षेत्र अधिकारी पातूर यांनी उपवनसंरक्षक के. आर. अर्जुना, सहाय्यक वनसंरक्षक सुरेश वडोदे यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांसोबत संबंधित क्षेत्रात पाळत ठेवून व नाकाबंदी केली. यावेळी अवैध वृक्षतोड करून सायकलीद्वारे चोर सागवान घेऊन जाताना आढळले.

वनकर्मचारी यांनी मुद्देमाल हस्तगत केला. अवैध वृक्षतोड करणाऱ्या चोरट्यांचा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला. मात्र जंगलामधील अंधाराचा फायदा घेत चोरटे सायकलवरील बांधलेला माल सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले. कार्यवाही वनरक्षक अतुल तायडे, लखन खोकड, अविनाश घुगे, बाळासाहेब थोरात, अरुण राठोड, गोपाल गायगोळ, सतीश साळवे, सुरजुसे, व इतर वन कर्मचारी सहभागी झाले होते. अवैध वृक्षतोड करणाऱ्या चोरांचा शोध सुरू असून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल ढेंगे करत आहेत.

'आम्हाला गुप्त माहिती मिळाल्यावर रात्री लगेच. नाकाबंदी केली व जंगलामध्ये त्यांच्यावर पाळत ठेवली. चोराकडून सागवान 30 नग व दोन सायकली जप्त केल्या आहे. अंधाराचा फायदा घेत चोर पळून जाण्यास यशस्वी झाले. वन कायद्या अंतर्गत गून्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येईल.

- विश्वनाथ चव्हाण​​​​ वन परिक्षेत्र अधिकारी, आलेगाव

सागवान चोरटे हे घटनास्थळा वरून पातूरच्या दिशेने पळाले. सागवान चोरटे शहरातील असल्याचि माहिती आहे. त्यांचा शोध लवकरच घेण्यात येईल.

- धिरज मदने वनपरीक्षेत्र अधिकारी, पातूर

बातम्या आणखी आहेत...