आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासादायक:अकोला शहराची तहान भागविणाऱ्या महान धरणामध्ये 33.53 टक्के जलसाठा, 1 जून रोजी झाली मोजणी

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण अकोला शहरासह नदीकाठावरील 64 गावखेड्यांची तहान भागविणाऱ्या महान धरणामध्ये यंदा 33.53 टक्के जलसाठा शिल्लक आहे. मुख्य म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 6 टक्के अधिक जलसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच दिवशी धरणामध्ये 27.81 टक्के जलसाठा उपलब्ध होता.

मागील वर्षी पाऊस चांगल्या प्रमाणामध्ये झाला. महान धरणाचा जलसाठा 100 टक्के भरल्या गेला. अतिरिक्त जलसाठा अनेकदा वक्रद्वार उघडून नदीपात्रात विसर्जित करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी पाणीपुरवठा करण्यात आला. महान धरणाचे पाणी संपूर्ण अकोला शहर, मूर्तिजापूर शहर, बोरगाव मंजू, एमआयडीसी अकोला, मत्स बीज केंद्र महान सह नदीकाळावरील 64खेडेगावांना वर्षभर पूरविण्यात येते.

यंदा अशी आहे पाणीपातळी

1 जून 2022 रोजी महान धरणाची पाणी पातळी 342.61 मिटर, 28.959 दलघमी व 33.53 टक्के आहे. मागील वर्ष हे प्रमाण 27.81 टक्के होते. यावर्षी पाणी पातळी 6 टक्के अधिक आहे.

यावर्षी धरण लवकर भरणार

पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यामध्ये धरण लवकर 100 टक्के पूर्ण करण्याची अपेक्षा आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महान धरणात पाच व्हॉल बसविण्यात आलेले आहेत. त्यापैकी सध्या दोन व्हॉल पाण्यावरती उघडे पडले असून तीन पाण्याखाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...