आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्यात कोव्हिडचा विस्फोट:जिल्हाभरात एकाच दिवसात 342 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू; जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातही संसर्ग

अकोला3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रॅपिडमधून 54 पॉझिटिव्ह, मृत्युचे सत्र सुरूच

कोरोनाचा संसर्ग आकोला जिल्ह्यात अत्यंत भयावह वेगात पसरत असून रविवारी, २१ फेब्रुवारीला एकाच दिवसात तब्बल ३४२ रुग्ण आढळल्याने हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हादरा ठरला आहे. संपूर्ण शहराला विळखा घातलेला कोरोना विषाणू जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात पसरत असल्याने परिस्थितीत हाताबाहेर जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांचा आकडा १३९३५ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ११५८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर ३५३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १९९७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

बाधित २८८ रुग्ण या भागातील : दिवसभरात प्राप्त अहवालांमधील २८८ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अकोट येथील ४९, डाबकी रोड येथील १०, खानापूर ता. पातूर व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी आठ, कौलखेड येथील सात, गीता नगर, मलकापूर, जठारपेठ व मोठी उमरी येथील प्रत्येकी पाच, तेल्हारा, खिरपुरी बु., जीएमसी, सिंधी कॅम्प, तापडियानगर व रामदासपेठ येथील प्रत्येकी चार, बोरगाव मंजू, जिल्हा कोर्ट, बाळापूर, उगवा, माळीपुरा, गोडबोले प्लॉट व रामनगर येथील प्रत्येकी तीन, वस्तापूर, गजाननपेठ, तुकाराम चौक, अंदुरा, भीमनगर, कीर्तीनगर, केदार मंदीर, लहान उमरी, बाळापूर रोड व आश्रयनगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कपिलेश्वर, अखातवाडा, खोबेरखेड, अपोती खु, अणकवाडी, अंबिकापूर, लाहोरा ता. बाळापूर, दुर्गा चौक, बोरगाव मंजू, भागवतवाडी, जवाहरनगर, बैदपूरा, नयागाव रोड, वाशीम बायपास, उमरी, विझोरा, रजपूतपुरा, हिंगणा रोड, जुने शहर, गायत्रीनगर, रिधोरा, खानापूर वेस ता. अकोट, आसेगाव ता. अकोट, अकोला जहाँगीर ता.अकोट, वणी वेटाळ ता.अकोट, रतनलाल प्लॉट, ज्ञानेश्वरनगर, शिव नगर, पार्वती नगर, डीएसपी ऑफीस, राऊतवाडी, केशवनगर, सहकारनगर, पत्रकार कॉलनी, शास्त्रीनगर, अशोक वाटिका, अकोट फैल, व्दारका नगरी, सातव चौक, रामदोगण प्लॉट, नरेंद्रनगर, गंगाधर प्लॉट, रणपिसेनगर, बार्शीटाकळी, वैष्णवी पार्क, पिंपळखुटा ता. बार्शिटाकळी, कान्हेरी सरप, आळंदा ता. बार्शिटाकळी, चिंचोली बार्शीटाकळी, राधेनगर, खोलेश्वर लोहिया, मनकर्णा प्लॉट, सुधीर कॉलनी, टिळक रोड व मराठानगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहेत. सायंकाळी ६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात शहरामधील विविध भागागील रुग्णांचा समावेश आहे.

रॅपिडमधून 54 पॉझिटिव्ह

दिवसभरातील ३२५ रॅपिड चाचण्यांमधून ५४ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये अकोट येथील सात, बार्शीटाकळीतील चार, तेल्हारा येथील आठ, मूर्तिजापूर येथील सात, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १५, हेडगेवार लॅब येथून १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

मृत्युचे सत्र सुरूच

कोरोनामुळे मृत्यूचे सत्र सुरूच असून मूर्तिजापूर येथील रहिवासी असलेल्या ८८ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना १० फेब्रुवारीला दाखल करण्यात आले होते.