आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • 36 Auspicious Yogas Of Planets And Constellations In November December; Immovable Property Like Land, House And Shop Will Be Purchased

दिव्य मराठी विशेष:नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ग्रह-नक्षत्रांचे ३६ शुभ योग; जमीन, घर आणि दुकानासारखी स्थावर मालमत्ता खरेदी ठरेल

अकाेला5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओमप्रकाश सोनोवणे | ऑक्टोबरनंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातही शुभ खरेदीचे योग आहेत. पहिला मुहूर्त १५ नोव्हेंबरला आहे, तेव्हा मंगळ पुष्याचा विशेष संयोग असेल. जमीन, घर, दुकान यांसारखी स्थावर मालमत्ता खरेदी करणे फायदेशीर ठरेल. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांत असे ३६ शुभ मुहूर्त आहेत. त्यापैकी १४ नक्षत्रांवर आधारित आणि २२ योगांवर आधारित आहेत. ज्योतिषांच्या मते, स्थावर मालमत्ता आनंददायी असते. त्यामुळे विशेष ग्रह-योगात त्यांची खरेदी शुभ मानली जाते.

मंगळ हा भूमिपुत्र मानला जातो, असे राष्ट्रीय ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर शास्त्री सांगतात. पुष्य नक्षत्र खरेदीसाठी शुभ. त्यामुळे मंगळाचा पुष्याशी संयोग स्थावर मालमत्ता म्हणजेच जमीन, घर, दुकान खरेदीसाठी उत्तम आहे. ज्योतिषाचार्य पं.मनीष शर्मा यांच्यानुसार विशेष योगात मालमत्ता खरेदी सुख-समृद्धीकारक असते.

योगावर आधारित
{नोव्हेंबर: १४-सर्वार्थ सिद्धी, सोम पुष्य,
१५- मंगळ पुष्य, २०, २३-अमृतसिद्धी, २४, २७, २८-सर्वार्थ सिद्धी, २०, २९-द्विपुष्कर।
{डिसेंबर : ४, ६, ७, १३, २५, २६-सर्वार्थ सिद्धी, ११-रवि पुष्य, १२-सोम पुष्य, २१ व ३०-अमृतसिद्धी, २०, २४, २५-त्रिपुष्कर।
(मुहूर्त ज्योतिषांनुसार)

नक्षत्रावर आधारित
{नोव्हेंबर : १७-मृगशीर्ष, पूर्वा फाल्गुनी, १८-पूर्वा फाल्गुनी, २४-अनुराधा, २५-मूळ। {डिसेंबर : १-पूर्वा भाद्रपदा, २-रेवती, ८ आणि ९-मृगशीर्ष, १५-पूर्वा फाल्गुनी, १६-उत्तरा आणि पूर्वा फाल्गुनी, २२-मूळ, २३-मूळ आणि पूर्वा फाल्गुनी, २९-पूर्वा फाल्गुनी, ३०-रेवती।

या नक्षत्रांमध्ये केलेली खरेदी ठरते शुभ
ज्योतिषी आचार्य पं. रामचंद्र शर्मा वैदिक यांच्या मते आश्लेषा, मघा, अनुराधा, विशाखा, पूर्वा भाद्रपद, पूर्वा फाल्गुनी, पुष्य आणि रेवती नक्षत्रांमध्ये शुभ आहेत. यामध्ये स्थावर मालमत्ता खरेदी केल्याने मालमत्तेत वाढ होते आणि वापरकर्त्याची प्रगती होते. पितांबरा ज्योतिष पीठाच्या ज्योतिषी अर्चना सरमंडल यांच्या मते, मुहूर्त आणि ग्रह-नक्षत्रांच्या आधारे खरेदी केलेली संपत्ती जीवनातील इतर संकटांपासून वाचवते.

बातम्या आणखी आहेत...