आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्य प्रकल्पाची वाटचाल 100 टक्क्यांकडे:काटेपूर्णा प्रकल्पातून 24 तासांत 3.98 दलघमीचा विसर्ग, प्रकल्पाचे दोन्ही दरवाजे केले बंद

अकोला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पातुन मागील 24 तासांत 3.98 दशलक्ष घनमिटर (398 कोटी 39 लाख 4 हजार लिटर) पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तुर्तास प्रकल्पाचे दोन्ही दरवाजे बंद करण्यात आले आहेत. जोरदार पाऊस झाल्यास प्रकल्पाचे दरवाजे पुन्हा उघडले जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून काटेपूर्णा प्रकल्प ओळखला जातो. या प्रकल्पाची साठवण क्षमता 86.35 दशलक्ष घनमिटर आहे. या प्रकल्पातून अकोला शहरासह विविध गावांची तहान भागवली जाते. तर हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली येते. यापूर्वी जिल्ह्यातील दुसऱ्या मोठ्या वान प्रकल्पाचे सहाही दरवाजे उघडण्यात आले होते. मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने वान प्रकल्पाचे दरवाजे तुर्तास बंद आहेत. तर 31 जुलै रोजी सकाळी 10 वाजता दोन दरवाजे 30 सेंटीमिटरने उघडण्यात आले. यातून 46.11 घनमिटर प्रतिसेकंद (46 हजार 110 लिटर प्रति सेकंद) पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. 1 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर कमी झाल्याने तसेच प्रकल्पातील आवक कमी झाल्याने सकाळी 10 वाजता प्रकल्पाचे दोन दरवाजे बंद करण्यात आले.

दरम्यान जोरदार पाऊस झाल्यास तसेच प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यास दरवाजे उघडले जातील, त्यामुळे प्रशासनाने काटेपूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अन्य प्रकल्पाची वाटचाल 100 टक्क्यांकडे

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांपैकी मोर्णा प्रकल्पात 83 टक्के, निर्गुणा प्रकल्पात 89.74 टक्के आणि उमा प्रकल्पात 83.48 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. मोर्णा आणि निर्गुणा प्रकल्पाला दरवाजे नाहीत. त्यामुळे हे प्रकल्प 100 टक्के भरल्या नंतर ओव्हरफ्लो होणार आहेत.

प्रकल्प -- साठवण क्षमता --- उपलब्ध साठा

काटेपूर्णा - 86.35 --- 70.65 दलघमी

वान -- 81.95 --- 53.77 दलघमी

मोर्णा - 41.46 -- 34.41 दलघमी

निर्गुणा - 28.85 - -- 25.89 दलघमी

उमा - 11.68 -- 9.79 दलघमी

दगड पारवा -- 8.82 दलघमी

बातम्या आणखी आहेत...