आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन:तिसरे राज्यस्तरीय वऱ्हाडी साहित्य संमेलन आज

अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, प्रस्तुत वऱ्हाड शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, लोणी व मराठी विभाग श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला यांच्या संयुक्त सहकार्याने बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी तिसरे राज्यस्तरीय वऱ्हाड लोककला साहित्य संमेलन श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे होत आहे.

डॉ. गणेश चंदनशिवे हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत, तर डॉ. केशव सखाराम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ होणार आहे.म. रा. साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. रवींद्र शोभणे, पुष्पराज गावंडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. संमेलनाचे मुख्य आकर्षण डॉ. चंदनशिवे यांचे लोककलेत तरुणांना संधी, चंदनशिवे यांची दुसऱ्या सदरात सादर होणारी लोककला व मथुरा लभाण लोकनृत्य हे आहे, अशी माहिती आयाेजकांच्या वतीने कळवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...