आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:अकोल्यात 40 मिनिटे धुव्वाधार पाऊस, आतापर्यंत अकोला जिल्ह्यात 64, तर अमरावतीत 24.3 मिमी सरासरी पाऊस

अकोला/ अमरावती12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.

रविवारी सायंकाळी अकोल्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी मेघगर्जना आणि विजांच्या लखलखाटात साधारण ४० मिनिटे जोरदार पाऊस पडला. यामुळे शहरातील काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते.

आतापर्यंत अकोला जिल्ह्यात सरासरी ६४.० मिलीमिटर पाऊस झाला असून यामध्ये सर्वाधिक म्हणजे १०३.७ मिलीमीटर पाऊस हा एकट्या अकोला तालुक्यात झाला आहे. विशेष म्हणजे कुरणखेड, बोरगाव मंजू या ग्रामीण भागातही पावसाचा जोर होता.

अमरावती | शनिवारनंतर रविवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस जिल्ह्यात झाला. २४ तासांत जिल्ह्यात २४.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, चांदूर बाजार व तिवसा तालुक्यातील प्रत्येकी दोन महसूल मंडळात ६५ मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या २४ तासांत सर्वाधिक १०७.५ मिमी पाऊस ब्राम्हणवाडा थडी मंडळात झाला आहे. त्याचप्रमाणे यामध्ये अमरावती, चिखलदरा, धारणी, तिवसा, चांदूर बाजार आणि मोर्शी या सहा तालुक्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. याचवेळी मात्र धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे, भातकुली तालुक्यात कमी पाऊस झाला आहे. दोन दिवसातील या पावसामुळे ग्रामीण भागात शेती पेरणीच्या कामांची लगबग वाढली आहे.

रविवारी सायंकाळी अकोला शहरात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे मोठी उमरी ते रेल्वे पुलापर्यंत रस्त्यावर पाणी साचले होते. छाया : नीरज भांगे.

बातम्या आणखी आहेत...