आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न आरोग्याचा:अकोला, हिंगोलीनंतर वर्धा जिल्ह्यातून बोलावले कोविशील्डचे 40 हजार डोस

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला लाभार्थ्यांचा प्रतिसाद वाढत असल्याने गेल्या काही दविसांपूर्वी कोविशील्ड लसीच्या तुटवडा निर्माण झाला होता. दरम्यान वर्धा जिल्ह्यातून अकोल्यासाठी नुकतेच ४० हजार डोसेसचा साठा प्राप्त झाला असून, या लसीचे केंद्रनिहाय वितरण करण्यात आले आहे. परिणामी लसीकरण सत्रांमध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यात बुधवारी, २७ जुलैला १०० हून अधिक सत्र सक्रीय झाले. दुपारपर्यंत ५ हजार लाभार्थ्यांनी लस घेतली.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने लसीकरणावर भर देण्यात येत आहे. याशविाय राज्य आणि केंद्र शासनाच्या सूचनांनुसार मोफत बूस्टर डोस देण्याची मोहीम जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे लसीकरणाला अधिक प्रतिसाद लाभत आहे. काही दविसांपूर्वी जिल्ह्यात कोविशील्ड लसींचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे बुलडाणा आणि हिंगोली जिल्ह्यातून ८ हजारांहून अधिक डोसेसची उपलब्धता करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यासाठी ५० हजार कोविशील्ड लसींची मागणी राज्याकडे केली गेली. मात्र अद्याप राज्याकडून लससाठा प्राप्त झाला नाही. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातून ४० हजार कोविशील्डचे डोसेस उपलब्ध करून घेण्यात आले आहेत. त्यामुळे तूर्तास दिलासा मिळाला आहे.

तीन टप्प्यांवर लसीकरण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वय वर्षे १८ ते ५९ या वयोगटातील लाभार्थ्यांसाठी १५ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधित शासकीय लसीकरण केंद्रावरून मोफत बूस्टर डोस देण्यात येत आहे. { १२ वर्षावरील मुलांच्या लसीकरणासाठी शाळा स्तरावर लसीकरण शिबिरांचे नियोजन करण्यात येत आहे. {दुसरा डोस आणि बूस्टर डोससाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र शिबिरे घेऊन लसीकरण करण्यात येत आहे.

आपसात पुरवठा ः वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार काही जिल्ह्यात कोविशील्ड लसींचा साठा उपलब्ध आहे मात्र त्या तुलनेत लसीकरणाला प्रतिसाद नाही. तर काही जिल्ह्यात लसीकरणाला प्रतिसाद आहे मात्र आवश्यक तो साठा नाही. त्यामुळे जेथे लस शिल्लक आहे तेथून गरज असलेल्या जिल्ह्यांना पुरवठा करा अशा सूचना असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...