आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष गाडी:अमरावती-पुणे द्वि-साप्ताहिक विशेष गाडीच्या 44 फेऱ्या ;16 पासून सुरूवात

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अमरावती-पुणे-अमरावती दरम्यान विशेष गाडीच्या ४४ फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार गाडी क्रमांक ०१४३९ पुणे- अमरावती द्वी- साप्ताहिक विशेष गाडी शुक्रवार आणि रविवार ही गाडी पुणे येथून १६ डिसेंबर ते २६ फेब्रुवारी दरम्यान धावणार आहे. शुक्रवारी आणि रविवारी रात्री २२.५० वाजता सुटेल आणि दौंड, लातूर, परळी, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे अमरावती येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी १७.३० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४४० अमरावती- पुणे द्वी- साप्ताहिक विशेष गाडी अमरावती येथून १७ डिसेंबर ते २७ फेब्रुवारी दरम्यान दर शनिवारी आणि सोमवारी रात्री १९.५० वाजता सुटेल आणि अकोला, वाशीम, हिंगोली, वसमत, पूर्णा, परभणी, परळी, लातूर, दौंड मार्गे पुणे येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी १६.२० वाजता पोहोचेल.

बातम्या आणखी आहेत...