आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसाठा:जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात 45.59 दलघमी जलसाठा; अनेक लघु प्रकल्पांतही मुबलक पाणी उपलब्ध, नागरिकांना दिलासा

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात ४५.५९ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. वानसोबतच मध्यम आणि लघु प्रकल्पात तूर्तास मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे.

जिल्ह्यात दोन मोठे, तीन मध्यम आणि ३६ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून अकोला शहरासह विविध गावांची तहान भागवली जाते तसेच हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली येते. मागील वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे मोठे,मध्यम आणि लघु प्रकल्प ओसंडून वाहिले. काटेपूर्णा, वान प्रकल्पाचे अनेकदा दरवाजे उघडावे लागले. त्यामुळे २०२२ च्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करण्याची गरज भासणार नाही, असे मत तज्ज्ञानी व्यक्त केले होते. त्याच बरोबर रब्बी हंगामात हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली आणता आली आहे. आता उन्हाळ्यास प्रारंभ झाल्याने तसेच मार्च महिना मध्यावर आल्याने पुन्हा एकदा प्रकल्पातील जलसाठ्याकडे लक्ष केंद्रित झाले.

लघु प्रकल्पात मुबलक जलसाठा
जिल्ह्यात ३६ लघु प्रकल्पात मुबलक जलसाठा आहे. १० लघु प्रकल्पात ५० टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे तर तीन प्रकल्पात १०० टक्के जलसाठा असून उर्वरित प्रकल्पात ५० टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे.

बाष्पीभवनामध्ये वाढ होण्याची शक्यता
पावसाळा संपल्या नंतर पुढील पावसाळ्या पर्यंत उपलब्ध जलसाठ्यात २५ टक्के पाण्याचे बाष्पीभवनाचा अंदाज पाटबंधारे विभागाकडून व्यक्त केला जातो. मात्र यावर्षी मार्च महिन्यातच तापमान ४२ अंश सेल्सिअस वर गेल्याने बाष्पीभवनात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रकल्पातील जलसाठा असा / दलघमी
प्रकल्प क्षमता उपलब्ध
काटेपूर्णा ८६.३५ ४५.५९
वान ८१. ९५ ५०.६५
मोर्णा ४१.४६ २१.१७
निर्गुणा २८.८५ १५.८३
उमा ११.६८ .२२

बातम्या आणखी आहेत...