आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासांस्कृतिक भवन बांधकामात दुसऱ्या टप्प्यातील कामे करण्यासाठी ५ कोटी ४८ लाख ६७ हजार रूपयांचे अंदाजपत्रक व आराखडे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग व सार्वजनिक बांधकाम मंडळाकडे पाठवण्यात होल्याची माहिती जिल्हा क्रीडा संकूल समितीची बैठकीत सादर करण्यात होली. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली.
बैठकीत जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांबाबत आढावा घेण्यात आला. शहरातील क्रीडा संकुलांमध्ये तसेच तालुकास्तरावर तयार होत असलेल्या क्रीडा संकुलांमध्ये गुणवत्तापूर्ण व आधुनिक क्रीडा सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारच्या बैठकीत दिले. क्रीडा संकुलांमध्ये येणाऱ्या खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे, त्या सुविधांची उत्तम देखभाल राखणे याबाबतही पालकमंत्री कडू यांनी उपस्थितांना निर्देश दिले. या बैठकीस जिल्हाधिकारी नीमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, गणेश कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.
ही होणार कामे : सांस्कृतिक भवनाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामात विद्युतसह अन्य कामे होणार होहेत. या कामांचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यासाठी नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला. या कामांमध्ये होंतरीक कामे, विद्युतीकरण, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरा सुविधा, अग्निशमन सेवा तसेच स्टेज, आसन व्यवस्था, प्रसाधन गृहे, ग्रीन रुम, भांडारगृहांची कामे प्रस्तावित आहेत.
क्रीडा संकुलांना मिळणार २ कोटी जिल्हा क्रीडा संकुलास ७ कोटी रुपये व तालुका क्रीडा संकुलासाठी २ कोटी रुपये निधी उपलब्ध होणार होहे. त्याअंतर्गत सिंथेटीक रनिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, हॉकीचे एस्टोटर्फ मैदान, फुटबॉल मैदान व अन्य सुविधांचे नुतनीकरण तसेच तालुका क्रीडा संकुलात कुस्ती हॉल, कबड्डी, खो खो साठी इनडोअर हॉल बांधण्यात
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.