आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 कोटी रस्त्याच्या कामांना मिळाली प्रशासकीय मंजुरी:पाच रस्त्याचे डांबरीकरण तर एका रस्त्याचे कॉक्रीटीकरण केले जाणार

अकोला5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सहा प्रमुख रस्त्याच्या डांबरीकरण तसेच कॉक्रीटीकरणासाठीच्या पाच कोटी रुपयाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने पुढील आठवड्यात या सहाही रस्त्याच्या कामास प्रारंभ होईल. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शहरातील अग्रसेन चौक ते दामले चौक-मराठा मंगल कार्यालय ते मालधक्का या महत्वपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. यासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजुर झाला आहे. दामले चौक ते फतेह चौक या सतत वर्दळीच्या रस्त्याचेही डांबरीकरण केले जाणार आहे. यासाठी एक कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहे. तर गोरक्षण रोडवरील एमएसईबी कार्यालय ते सिंधी कॅम्प रोड या महत्वपूर्ण मार्गाचे देखिल डांबरीकरण केले जाणार असून या रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. त्याच बरोबर शहरातील मध्यवर्ती भागातील पंचायत समिती कार्यालय चौक ते वसंत टॉकीज ते शहर कोतवाली या मार्गाच्या डांबरीकरणासाठी एक कोटी रुपये मंजुर झाले आहेत. गोरक्षण मार्गावरील सिमेंट रस्ता ते साई मंदिर ते आझाद कॉलनी पर्यंतच्या मार्गाचे देखिल डांबरीकरण केले जाणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी 30 लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत. पाच रस्त्याच्या डांबरीकरणा सोबतच जुने शहरातील सुविधा मेडीकल ते काळा मारोती मंदिर ते शंकर साऊंड सर्व्हिस (लोखंडी पुलाजवळ) या रस्त्याचे कॉक्रीटीकरण केले जाणार आहे. या कॉक्रीटीकरणासाठी ७० लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

शहरातील या सहा महत्वपूर्ण मार्गाच्या दुरुस्तीसाठी नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठीच्या निधीतून आमदार गोवर्धन शर्मा यांनी पाच कोटी रुपयाचा निधी शासनाकडून मंजुर करुन आणला होता. या सर्व कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. महापालिकेने यापूर्वीच या रस्त्याच्या कामांची निविदा प्रक्रिया राबविल्याने या सर्व रस्त्याच्या कामांना पुढील आठवड्यात प्रारंभ करण्यात येईल. या रस्त्याची कामे झाल्या नंतर नागरिकांनी सुविधा उपलब्ध होईल. विशेषत: एमएसईबी कार्यालय ते सिंधी कॅम्प या महत्वपूर्ण दोन मार्गाना जोडणाऱ्या रस्त्याची चाळणी झाली आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्या नंतर गोरक्षण मार्गावरुन सिंधी कॅम्पला जाणे-येणे करणे सोयीचे होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...