आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता:जिल्ह्यातील 50 बेपत्ता महिलांचा घेतला शोध

अकाेला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील बेपत्ता होणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. या संदर्भात विविध ठाण्यात दाखल तक्रारीचा मागोवा घेण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेतून ५० बेपत्ता महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. याशिवाय एका अपहृत मुलीचाही पोलिसांनी शोध घेतला.

पोलिस दलातर्फे ‘मिसिंग शोध’ ही मोहीम राबवली जाते. २० ते ३१ जुलै या कालावधित राबवलेल्या मोहिमेत पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात, पीएसआय सुकेशनी जमधाडे, महिला पोलिस कर्मचारी अनिता टेकाम यांनी बेपत्ता एक महिला व एका पुरुषाचा शोध घेतला. आतापर्यंत राबवलेल्या विशेष मोहिमेतून ७७ जणांचा शोध घेतला आहे. त्यात ५० महिला व २६ पुरुष, अपहृत मुलीचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...