आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बूस्टर डोस:वीस दिवसांमध्ये ५० हजार लाभार्थ्यांनी घेतला बूस्टर डोस

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिरातील बूस्टर डोसच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वीस दिवसात जिल्ह्यात ५०११९ लाभार्थ्यांनी बूस्टर डोस घेतला. तर वीस दिवसातील लसीकरण हे ७९,८२० झाले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वय वर्षे १८ ते ५९ या वयोगटातील लाभार्थ्यांसाठी १५ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान शासकीय लसीकरण केंद्रावरून मोफत बूस्टर डोस देण्यात येत आहे. याला जिल्ह्यात प्रतिसाद मिळत असून, शहरी,ग्रामीण भागात लसीकरणाची गती वाढल्याचे दिसते. २१ जुलैला जिल्ह्याचे बूस्टर डोसच्या मोहिमेतील स्थान हे २७ व्या क्रमांकावर होते. २९ जुलैला ते १७ व्या क्रमांकावर आले. जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालये, संस्था, शाळा स्तरांवर लसीकरण शिबिरांचे नियोजन करून लसीकरणाचा टक्का वाढवला जात आहे. त्यानंतर आठ दिवसातील कामगिरीनंतर जिल्हा १४ व्या स्थानावर आला.

बूस्टर डोस मोहिमेत जिल्ह्याने घेतली आघाडी
राज्यातील बूस्टर डोस मोहिमेत जिल्ह्याने आघाडी घेतली. आठ दिवसातील एक ते दोन दिवस वगळता लसीकरणाचा वेग जास्त होता. आठवडाभरापूर्वी बूस्टर डोसमध्ये जिल्ह्याचे स्थान १७ वे होते. त्यानंतर बूस्टर डोसचे काम वाढवून आठच दिवसात जिल्हा राज्यात १४ व्या स्थानी आला आहे.

नागरिकांचा प्रतिसाद
जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण भागातून बूस्टर डोसच्या मोहिमेसह इतर डोसेसाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. ज्यांचा पहिला, दुसरा, बूस्टर डोस बाकी आहे. अशा लाभार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे.
डॉ. मनीष शर्मा, जिल्हा लसीकरण अधिकारी

बातम्या आणखी आहेत...