आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागाचे कामकाज कोलमडले:गुंठेवारीच्या 500 फाइल्स रखडल्या

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका नगररचना विभागात कायम नगररचनाकार नसल्याने नगररचना विभागाचे कामकाज कोलमडले आहे. गुंठेवारी नियमानुकुलच्या ५०० फाइल्स रखडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत तर महापालिकेला लाखो रुपयाच्या महसुलापासून मनपाला वंचित राहावे लागत आहे.

महापालिकेत नगररचना हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे. शहरातील सर्व बांधकामांना मंजुरी देण्याचे काम नगररचना विभागाकडून केले जाते. महापालिकेची हद्दवाढ झाल्याने आता क्षेत्रफळातही वाढ झाली आहे. त्यामुळे बांधकाम मंजुरीच्या फाइल्स तसेच गुंठेवारीचे नियमानुकूलचे काम ऑफ लाइन पद्धतीने सुरू करण्यात आले आहे.

महापालिका महसुलापासून वंचित
गुंठेवारी नियमानुकुलचे दोन हजार प्रस्ताव दाखल झाले आहेत. यापैकी ५०० प्रकरणाची मंजुरी रखडली आहे. तर उर्वरित प्रोसेसमध्ये आहेत. या फाइल्स मंजुर होत नसल्याने महापालिका लाखो रुपयांच्या महसूलापासून वंचित आहे.

बातम्या आणखी आहेत...