आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान शिबिर:गणेशोत्सवानिमित्त 51  जणांचे रक्तदान

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री जागेश्वर गणेशोत्सव मंडळ व छत्रपती सेनेच्या वतीने गणेशोत्सवाचे निमित्त साधत वाडेगाव येथील श्री जागेश्वर मंदिराच्या सभागृहामध्ये नुकतेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.दररोज रक्ताची भासणारी गरज आणि दुसरीकडे रक्ताची निर्माण होणारी टंचाई लक्षात घेता सामाजिक जाणिवेतून छत्रपती सेनेच्या वतीने वाडेगाव येथील श्री जागेश्वर मंदिराच्या सभागृहात रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण साहू, युवासेना जिल्हा प्रमुख नितीन मानकर, रक्ताचं नातं ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विजय गावंडे, दिलीप गावंडेच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर अकोला येथील साई ब्लड बँक रक्तपेढीच्या चमूने रक्त संकलनाचे काम केले. यावेळी रक्तदात्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. या शिबिरात राहुल शर्मा, अमोल फाळके, वैभव सौदळे, विजय डोईफोडे, राजू रायकर, मनोज मानकर, मंगेश मानकर, अन्सार शहा, सूरज अवचार, नीलेश सावदेकर, राजू गावंडे, सूरज गजानन अवचार, नागेश लाभाणे, ज्ञानेश्वर सरप, सुमेध अवचार, नरेंद्र नागरे, मंगेश दुतोंडे, नितीन निंबोकार, शुभम मानकर, आकाश वानखडे, शेवलाल गावंडे, किरण मोकळकार, दत्ता मानकर, रोहन लांडे, रिषभ मानकर, ज्ञानेश्वर काकड, रिषभ खिलोशिया, हृषिकेश भटकर, धीरज भटकर, आकाश मानकर यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...