आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:कृषी वीजपंपाच्या देयकामधून ५२ शेतकरी थकबाकी मुक्त; महावितरण कंपनीच्या कृषी मेळाव्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील शेतकरी बांधवांना शेती पंपाच्या देयकातून थकबाकी मुक्त करण्यासाठी सुरू केलेल्या कृषी धोरण २०२० ची माहिती देण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकरी मेळावे आयोजित करण्यात आले होते. महावितरणच्या या मेळाव्याला शेतकरी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. महावितरणच्या कृषी धोरण २०२० ची माहितीमुळे प्रभावीत होऊन ५२ शेतकरी बांधवांनी तात्काळ थकबाकीची रक्कम भरून थकबाकी मुक्त झाले.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अकोला ग्रामीण विभागातर्फे अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर, माळराजूरा, भंडाराज, आलेगाव, विवरा, आडसिंगी व वासाडी या गावांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी धोरण २०२० योजने अंतर्गत शेतकरी बांधवांचे कृषी मेळावे घेण्यात आले. जवळपास ८७० कृषी ग्राहकांनी मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवला. त्यापैकी एकूण ५२ शेतकरी पूर्ण वीज बिल भरून थकबाकी मुक्त झाले.

७३९ शेतकऱ्यांनी रुपये ६४ लाख ६८ हजारांचा भरणा महावितरणकडे केला. मंडळ अधिक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनात कार्यकारी अभियंता ग्रा. विजयकुमार कासट, अतिरिक्त कार्यकारी अभियंता व्ही. आर. काळे, उप विभागीय अभियंते एस . एस . खुमकर, व्हि . के. गुबे, व्हि. जी. बोळे, एम. ए . खांडरे , ए. एस कलावटे तसेच विद्युत कर्मचाऱ्यांनी कृषी मेळाव्यांच्या आयोजनाकरिता परिश्रम घेतले. येत्या काळात शेतकरी बांधवांना योजनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्ह्यात मेळावे घेणार आहे. थकबाकीच्या यादीतून मुक्त होण्यासाठी,देयकाच्या रकमे संदर्भात शंका असल्यास शेतकऱ्यांंनी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...