आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना दिलासा:सप्टेंबर-ऑक्टाेबर महिन्यातील पिकांच्या भरपाईसाठी 54 काेटी 44 लाख मंजूर

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टाेबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची मदतीसाठी ५५ काेटी ४४ लाख रुपये मंजूर झाले आहे. सप्टेंबर महिन्यात २३ हजार ८५१.७ हेक्टर तर ऑक्टोबरमध्ये १० हजार ४१३.९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले हाेते. यंदा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला. त्यानंतर ऑक्टाेबर महिन्यात परतीच्या पावसानेही धुमाकूळ घातला. यंदा पावसाळ्यात नदी-नाले भरून वाहत असून, सिंचन प्रकल्पातून तर अनेकदा पाण्याचा िवसर्ग करण्यात आला.

पावसामुळे कापूस, साेयाबीनसह अन्य पिकांची हानी झाली. वातावरण बदलाचा फटका शेतीला बसत असून, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतमालाचे उत्पादन प्रचंड घटले आहे. सप्टेंबर व ऑक्टाेबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले. जिल्हा प्रशसानाने िवभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे िनधी मागणी करण्यात आली. त्यानुसार मदत मंजूर झाली आहे.

नजर मदतीवर सप्टेंबर : या महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ३४ कोटी १६ लाख ४४ हजारांचा निधी मंजूर झाला ऑक्टोबर : यामहिन्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २० कोटी २७ लाख ७२ हजार रुपये िमळणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...