आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात ऑगस्ट २०२२ महिन्यापासून जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाच्या प्रादूर्भावाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या तीन महिन्यात अनेक जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला. लम्पीने दगावलेल्या पशुंच्या बदल्यात नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे करून आर्थिक मदतही शेतकरी पशू पालकांना देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७०१ मयत पशूधनाच्या मोबदल्यात ४ कोटी ९ लाख रुपये पशूपालकांना देण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. मात्र अद्यापही ५९९ पशूपालक मदतीपासून वंचित आहेत.
जिल्ह्यात गेल्या वर्षी लम्पी चर्मरोगाने धुमाकूळ घालत शेतकरी आणि पशूपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गायी आणि म्हशींच्या उपचारांवर खर्च करूनही शेतकरी पशूंना वाचवू शकले नाहीत. त्यामुळे अनेकांना शेतीला जोडधंदा म्हणून उत्पन्नाचा आधार असलेले पशूधन गमवावे लागले. लाखमोलाची बैल मृत्युमुखी पडल्याने अनेक शेतकऱ्यांवर संकट आले. दरम्यान मृत झालेल्या पशुंच्या बदल्यात शेतकरी, पशुपालकांना भरपाई देण्यासाठीची रक्कम शासनाने जाहीर केली होती, त्यानुसार पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहेत. मात्र अजूनही जिल्ह्यात अनेक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
सर्वाधिक मृत्यू अकोट, तेल्हारा तालुक्यात
लम्पी चर्मरोगामुळे आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू हे अकोट आणि तेल्हारा तालुक्यात झालेले आहेत. अकोट तालुक्यात ४९९ पशू दगावले आहेत. तर तेल्हारा तालुक्यात ४४९ पशूंचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर अकोला ३४८, बाळापूर ३३६, बार्शीटाकळी १५८, पातूर २३५, मूर्तिजापूर २७४ असे जनावरे लम्पीमुळे दगावले आहेत.
वितरणाची प्रक्रिया सुरू
जिल्ह्यात लम्पीमुळे मृत्यू झालेल्या पशूधनाच्या मोबदल्यात पशुपालकांना आर्थिक मदत देण्यात येत आहे. आतापर्यंत ४ कोटींहून अधिक रक्कम दिली . ५६ लाखांची मदत आली . ती वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, अकोला.
अशी दिली मदत
२३०० - पशूधनाचा लम्पीमुळे मृत्यू १७०१ - पशूधनाचा मोबदला देण्यात आला ४ कोटी ९ लाखांची रक्कम मदत म्हणून देण्यात आली.
मदत देणे बाकी
५९९ मृत पशूंचा मोबदला देणे अद्याप बाकी आहे. ५६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे.
अशी दिली मदत २३०० - पशूधनाचा लम्पीमुळे मृत्यू १७०१ - पशूधनाचा मोबदला देण्यात आला ४ कोटी ९ लाखांची रक्कम मदत म्हणून देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.