आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमांचे उल्लंघन:वाहन चालकांकडे थकला 6 काेटी 33 लाख रुपयांचा दंड ; पाेलिसांनी ई-चालानद्वारे केली हाेती कारवाई

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने वाहनाचलकांकडे ६ काेटी ३३ लाख ७९ हजारांचा दंड थकला असून, पाेलिसांनी आतापर्यंत १ लाख ४८ हजार ७६६ समन्स जारी केले आहेत. हा दंड शनविारी १२ नाेव्हेंबर राेजी हाेणाऱ्या लाेकअदालतीच्या माध्यमातून भरता येणार आहे.

वाहन चालवताना माेबाइल फाेन हाताळणे, ट्रिपल सीट प्रवास करणे, ट्राफिक सिंग्नलचे उल्लंघन करणे आदी प्रकार अनेक वाहन चालकांकडून सर्रासपणे हाेतात. अनेकदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना राेखण्याचा प्रयत्न करतात. मात्र चालन पळून जाताे. अशी वेळी पाेलिस वाहनाचा क्रमांक नाेंदवतात. दरम्यान वाहन चालकांकडे दंड थकला असून, संबंधितांना मोबाइल फाेनवर सूचनाही देण्यात आली आहे.

हे प्रकार बंद केव्हा हाेणार? ः वाहनाला डुप्लिकेट सायलेन्सर लावून मोठ्या आवाजात फटाके फोडणाऱ्या दुचाकीस्वारांकडून धुमाकूळ घालण्यात येत आहे. याबाबत वाहतूक शाखेला तक्रार झाल्यानंतर पाेलिसांनी कारवाईला प्रारंभ केला हाेता. फटाके फोडणारे सायलेन्सर बसवल्याने काही दविसांपूर्वी पाेलिसांनी १८ दुचाकी जप्त केल्या हाेत्या. मात्र तरीही हुल्लडबाजी थांबत नसल्याचे दिसून येत आहे. चालकांनी शासन निमयानुसारच वाहनांना सायलेन्सर, हाॅर्न लावावा; अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पाेलिसांनी दिला आहे.

येथेही भरता येणार दंड पाेलिसांनी आतापर्यंत ई-चालान करण्यात आलेल्या वाहनावर १ लाख ४८ हजार ७६६ केसेस केल्या आहेत. ई-चालान दंड प्रलंबित असणाऱ्या वाहनधारकांना शनविारी १२ नाेव्हेंबर राेजी हाेणाऱ्या लोकअदालतीपूर्वी वाहतूक पाेलिसांकडे दंडाचा भरणा करण्याबबात वाहनधारकांना एस. एम. एस. पाठवण्यात आला आहे. दंडाचा भरणा हा वाहनधारकांना आलेल्या एस. एम. एसवरील लिंकद्वारे अथवा महाट्रॅफीक अॅप द्वारेही भरता येणार आहे.

...तर खटला दाखल हाेणार प्रलंबित ई-चालान तडजोड रक्कम शासन जमा करावी; अन्यथा दंडाच्या तडजोड रक्कम न भरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध न्यायालयात खटले भरण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...