आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळेत खर्चाचे आव्हान, प्रत्येक आमदारांना 80 लाख:जिल्ह्यात विकास कामांसाठी 6 काेटी 40 लाख निधी मंजूर

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सत्तांतरानंतर कामांना देण्यात आलेली स्थगित उठल्यानंतर दुसऱ्यांदा आमदार विकास िनधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येकास ८० लाखांचा िनधी मंजूर करण्यात आल्याचा शासन िनर्णय नियाेजन विभागाकडून जारी झाला आहे. २०२२-२३ साठी आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत विकास कामांसाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करुन देण्याची तरतूद आहे. मात्र आर्थिक वर्ष संपण्यासाठी तीनच महिने राहिले असून, हा निधी विहित मुदतीत खर्च करण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणांपुढे उभे ठाकले आहे.

दरवर्षी राज्य शासनाकडून ववििध विकास कामांसह उपक्रमांसाठी िनधी मंजूर करण्यात येताे. हा िनधी जिल्हा वार्षिक याेजनेअतंर्गत वितरीत करण्यात येताे. वितरणाचे िनयाेजन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील िजल्हा नियाेजन समितीकडून (डीपीसी) करण्यात येते. िनधीसाठी सरकारच्या ववििध यंत्रणाकंडून िनयाेजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात येतात. समितीकडूनही प्रस्ताव मागवण्यात येतात. त्यानुसार समिती प्रस्तावांना मंजुरी प्रदान करते. दरम्यान चालू आर्थिक वर्षात आमदारांना विकास कामांसाठी आता दुसऱ्या टप्प्यात निधी मंजूर करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...