आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथकाची कारवाई:बाळापुरात 4 तलवारींसह 6 चाकू जप्त; पोलिस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई ; आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल

अकोला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळापूरमधून एका आरोपीच्या घरातून पोलिसांनी ४ प्राणघातक शस्त्रे व ६ मोठे चाकू जप्त केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या पथकाने मंगळवारी केली. आरोपीविरुद्ध आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास गोपनीय माहिती मिळाली की, बाळापूर शहरातील वजीराबाद परिसरात राहणारा शेख करीम उर्फ कल्लू पहलवान शेख रहीम वय ४४ याच्या घरात प्राणघातक शस्त्र आहेत. तो ती शस्त्रे गुन्हे करण्याच्या उद्देशाने बाळगून आहे. अशा माहितीवरून पोलिसांनी शेख करीम याच्या घरात छापा टाकला. यावेळी पोलिसांना त्याच्या घरात ४ मोठ्या तलवारी त्यांची लांबी ८५ सेमी व रूंदी ६ सेमी आहे. दोन मोठे जम्बीया चाकू ज्याची लांबी ५७ सेमी व चार सेमी रंदी, सहा मोठे सुरा चाकू, अशी १२ प्राणघातक शस्त्रे दिसून आली. पोलिसांनी ती जप्त केली आहेत. आरोपीकडे याबाबत कोणताही परवाना नसल्याचे समोर आल्याने बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगली म्हणून पोलिससांनी आरोपीविरुद्ध बाळापूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली. शांतीनगरातून रविवारी केली होती तलवार जप्त : रविवारी अकोला शहरात पोलिस पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान त्यांनी शांती नगर येथे राहणारा मुसाहिब खान समीर खान याच्या घराची संशयावरून झडती घेतली असता त्याच्या घरात एक लोखंडी तलवार ८४.५ सेमी., एक लोखंडी कत्ता ३८ से. मी. दिसला होता. पोलिसांनी डाबकी रोड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ही कारवाईसुद्धा पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...