आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतशिवार:जिल्ह्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा सहा टक्के कमी पाऊस ; सरासरीनुसार 536.3 मिमी पाऊस

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑगस्ट अखेर आणि सप्टेंबरच्या प्रारंभी पावसात पडलेल्या खंडामुळे जिल्हा गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसात सहा टक्क्यांनी मागे पडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत ३८.३ मिलीमीटर म्हणजे ६.४ टक्क्यांनी पाऊस कमी आहे. ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत विदर्भात बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

येत्या काही दिवसात जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रारंभीच्या काळात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असले तरी गेल्या दोन आठवड्यात वारंवार बदललेले वातावरण आणि तीव्र उन्हासह उकाडा जाणवला. शिवाय अनेक भागात रिमरिम पाऊस वगळता पावसाची विश्रांती दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेतही पावसाचे प्रमाण काहीसे कमी असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एकूण पावसाळ्यातील सरासरी ५९५. ३ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो. त्यापैकी ५३६.३ मिलीमीटर पाऊस आतापर्यंत झाला आहे. हा पाऊस आतापर्यंतच्या सरासरीनुसार ९० टक्के आहे. एकूण वार्षिक सरासरीचा विचार केल्यास जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत ६९३.७ मिलीमीटर पाऊस होतो. त्यापैकी ७७.३ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. दरम्यान गेल्या वर्षी ५ सप्टेंबरपर्यंत ५७४.६ मीमी म्हणजे ९६.५ टक्के पाऊस होता. यंदा जुलै महिन्यात जिल्ह्यात अधिक पाऊस झाला. जुलै जिल्ह्यात सलग झालेल्या पावसामुळे शेतशिवारातील आंतरमशागतीची कामेही खोळंबली होती.

बातम्या आणखी आहेत...