आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान ‘हर घर तिरंगा’,हा उपक्रम राबवण्यात येणार असून, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘झेंडा विक्री केंद्रा’चे शुभारंभ जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. प्रत्येक घरावर तिरंगा लावून सर्व नागरिकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकारकडून सध्या 60 हजार ध्वज उपलब्ध झाले आहेत.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उमेद ग्रामीण जीवननोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत झेंडा विक्री केंद्राचे शुभारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपजिल्हाधिकारी(रोहयो) बाबासाहेब गाढवे, उपजिल्हाधिकारी(पुनवर्सन) सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, शैक्षणीक गुणवंत विकास केंद्राचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले, उमेद अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र काकड, तालुका अभियान व्यवस्थापक अनिल शेरेवार, कौशल्य विकास समन्वयक अमोल विरोंकार, सुधीर फलके, भारतभूषण टोपरे आदि उपस्थित होते.
स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील नायक,क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, उद्देशाने "आजादी का अमृत महोत्सव" अर्थात “स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवानिमित्त "हर घर तिरंगा" हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिक, शासकीय- निम शासकीय आस्थापना, शैक्षणिक संस्था इ. ठिकाणी स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज उभारावयाचा आहे.
या ठिकाणी आहेत केंद्र
उमेद प्रकल्पाअंतर्गत असलेल्या बचत गटामार्फत जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर झेंडे विक्री करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 1 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात तीन ठिकाणी झेंड विक्री केंद्राचा शुभारंभ झाला आहे. त्यात जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जिल्हा परिषद परिसर व वनविभाग येथील वनधन विक्री केंद्र येथे झेंडे विक्री केले जाणार आहे. सर्व नागरिकांनी स्वखर्चाने घरांवर तिरंगा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.