आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सादरीकरण:उद्यापासून 61 वी हौशी मराठी नाट्य स्पर्धा

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६१ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२२-२३ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला १५ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. अकोला-अमरावती जिल्ह्यातील प्राथमिक फेरी २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर रोजी होणार आहे.

अकोला केंद्रावरील प्राथमिक फेरी प्रमिलाताई ओक हॉल येथे तर, अमरावती येथील प्राथमिक फेरी कै. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व्हीएमव्ही अमरावती येथे संपन्न होत आहे. हौशी रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने गेली ६० वर्षे ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जाते.

या वर्षी अकोला केंद्रातून ९ आणि अमरावती केंद्रातून ११ संघ सहभागी झाले अाहेत. अकोला अमरावतीमधील रसिक प्रेक्षकांसाठी नाट्य मेजवानीच असणार आहे. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी या नाट्य स्पर्धेचा आस्वाद घ्यावा आणि कलाकारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन समन्वयक सचिन विजय गिरी यांनी केले आहे. अकोला-अमरावती जिल्ह्यातील प्राथमिक फेरी २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरला होणार आहे. स्पर्धेसाठी कलावंताप्रमाणे सरिकांमध्येही उत्साह दिसून येत आहे.

२६ नोव्हें. ‘अट आली अंगलट’, राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक वाचनालय, अकोला. २७ नोव्हें. ‘फास’ लेखक, माणुसकी मल्टी फाऊंडेशन, बुलडाणा. २८ नोव्हें. ‘फ्रेंडशीप’, हिमानी फाऊंडेशन, अकोला. २९ नोव्हें. ‘महादेव जातो गा’, धनश्री बहुउद्देशीय शिक्षण संस्था, बुलडाणा. ३० नोव्हें. ‘मी काहिही विसरलो नाही’, बुलडाणा, अर्बन चॅरिटेबल ट्रस्ट सोसायटी, बुलडाणा. १ डिसें. ‘एक्सपायरी डेट’, अविष्कार बहुउद्देशीय संस्था, वाशीम. २ डिसें. ‘लांब जाना, एक वेगळी प्रेमकथा’, ऊर्जा फाउंडेशन, अकोला. ३ डिसें. ‘गोपाळा रे गोपाळा’, अंतरंग फाउंडेशन, अकोला. ४ डिसें. ‘वळण’, अंकुर साहित्य संघ, अकोला.

बातम्या आणखी आहेत...