आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काटेपूर्णा प्रकल्पात 63 टक्के जलसाठा:अकोल्यातील मध्यम तसेच लघु प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ, वान प्रकल्पाचे दरवाजे केले बंद

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात ६३.०९ टक्के जलसाठा झाला आहे. दरम्यान, दुसऱ्या मोठ्या वान प्रकल्पाचे १८ जुलैरोजी उघडलेले दरवाजे २५ जुलैरोजी बंद करण्यात आले.

हजारो हेक्टर सिंचनाखाली

जिल्ह्यातील सर्वात मोठा मोठा प्रकल्प म्हणून काटेपूर्णा प्रकल्प ओळखला जातो. काटेपूर्णा प्रकल्पाची साठवण क्षमता ८६.३५ दशलक्ष घनमीटर आहे. प्रकल्पातून अकोला शहरासह खारपाणपट्टा तसेच इतर अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातो. तर हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली आणली जाते. त्यामुळे जिल्ह्यासाठी काटेपूर्णा प्रकल्प महत्वाचा ठरतो. वान प्रकल्पाच्या तुलनेने काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठ्यात हळुहळू वाढ होत आहे. तर, वान प्रकल्पातून १८ जुलै रोजी विसर्ग सुरु करण्यात आला होता. सातपूडा भागात पावसाचा जोर कमी झाल्याने २५ जुलै रोजी रात्री आठ वाजता प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात आले. मात्र पावसाचा जोर वाढल्यास प्रकल्पाचे दरवाजे पुन्हा उघडले जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी दिली. एकीकडे काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली असताना मध्यम आणि लघु प्रकल्पातील जलसाठ्यातही वाढ झाली आहे.

प्रकल्पातील जलसाठा असा

प्रकल्प - साठवण क्षमता - उपलब्ध साठा - टक्केवारी

  • काटेपूर्णा - ८६.३५ - ५४.४८ दलघमी - ६३.०९ टक्के
  • वान - ८१.९५ - ५०.८२ दलघमी - ६२.०१ टक्के
  • मोर्णा - ४१.४६ - ३०.२८ दलघमी - ७३.०३ टक्के
  • निर्गुणा - २८.८५ - २३.०८ दलघमी - ८० टक्के
  • उमा - ११.६८ - ९.६२ दलघमी- ८२.३६ टक्के
  • दगड पारवा - ८.२६ दलघमी- ८१.०५ टक्के
बातम्या आणखी आहेत...