आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभय योजना:अकोल्यात हद्दवाढ भागासह महापालिका क्षेत्रात 65 हजार 920 नळजोडण्या झाल्या वैध

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका क्षेत्रात आता पर्यंत 65 हजार 920 नळजोडण्या वैध झाल्या आहेत. तर अद्यापही 15 ते 20 हजार नळजोडण्या अवैध असल्याचा अंदाज पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केला आहे.

महापालिकेचा अमृत योजनेत समावेश झाल्यानंतर पाणीपुरवठा योजनेचे सबलीकरणाचे काम सुरू करण्यात आले. यासाठी 110 कोटी रुपये खर्च करण्यात आले. जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या अंथरण्याच्या कामाचाही यात समावेश होता. जलवाहिन्या बदलल्यानंतर जुन्या जलवाहिन्यांवरील वैध नळजोडण्या पुन्हा जोडून देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची होती. यासाठी कंत्राटदाराला वेगळे पैसे देण्यात आले होते.

चार वर्षांपूर्वी महापालिकेने 34 हजार नळजोडण्या पुन्हा जोडण्याचे काम करारानुसार कंत्राटदाराला दिले. चार वर्षापूर्वी महापालिकेच्या दप्तरी केवळ 34 हजार नळजोडण्या वैध होत्या. तर मालमत्तांची संख्या दीड लाख होती. त्यामुळेच शहरात मोठ्या प्रमाणात अवैध नळजोडण्या आहेत, ही बाब स्पष्ट झाली होती. ही बाब लक्षात घेवून महापालिकेने अवैध नळजोडण्या वैध करण्यासाठी अभय योजना राबवली.

योजनेला सतत मुदतवाढ

अभय योजनेत केवळ 400 रुपयात नळजोडणी वैध करण्यात आली. या योजनेला सतत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, 400 रुपयात नळजोडणी वैध करताना दोन वर्षापेक्षा अधिक वर्षाचा कर थकीत नको, अशी अट घालण्यात आली होती. त्यामुळे ज्या अवैध नळधारकांकडे दोन वर्षापेक्षा अधिक वर्षाचा कर थकीत आहे, त्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली. मात्र, या योजनेचा चांगला परिणामही दिसून आला. चार वर्षात वैध नळांची संख्या दुप्पट झाली. ही संख्या आता 65 हजार 920 झाली आहे. दरम्यान शहरात 82 ते 85 निवासी मालमत्ता असल्याने अद्यापही शहरात 15 ते 20 हजार अवैध नळजोडण्या आहेत. यामुळे महापालिकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...