आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलजीवन मिशन योजना:जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनेसाठी 66 कोटी 58 लाखांचा अंदाजपत्रकास मान्यता; गावातील ग्रामस्थांना दिलासा

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील लंघापूर व 50 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला व स्वच्छता विभागाने प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे. या योजनेसाठी 66 कोटी 58 लाख 37 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात देण्यात आली आहे. या योजनेमुऴे 50 पेक्षा जास्त गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण होते. पाण्याचे स्त्रोत नसल्याने ग्रामस्थांना मिळेल ते पाणी घ्यावे लागते. परिणामी त्यांना अनेक आजारही होतात. त्यामुळे त्यांना प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांवरच अवलंबून राहावे लागते. दरम्यान तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारच्या काळात लंघापूर व 50 गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. सप्टेंबर 2020 पासून प्रक्रियेला प्रारंभ झाला. मजीप्राच्या तांत्रिक छाननी उपसमितीने 10 जून रोजी मान्यता दिली होती.

योजनेची होणार पाहणी

पाणी पुरवठा योजनेची अंमलबाजवणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर मजीप्रा,जिल्हा परिषद व संबंधत ग्राम पंचायतचे अधिकारी यांची संयुक्तपणे पाणी होणार आहे. या पाहणीत दोष आढळून आल्यास ते दूर करण्यात येणार आहे. त्यानंतर एका महिन्यात योजना ताब्यात घेण्याची जबाबदारी जि.प.किंवा संबंधित शिखर समितीची राहिल असे पाणी पुरवठा विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रत्येक घरास नळ जोडणी

पाणी पुरवठा योजनेतून प्रत्येक घरास नळ जोडणी देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आतापर्यंत दिलेल्या नळ जोडणी व पुढे देण्याच्या नळ जोडणीबाबतची माहिती नोंदवणे गरजेचे राहणार आहे. नवीन जोडणीबाबत नियोजनाची जबाबदारी संबंधित ग्राम पंचायतीची राहणार आहे.

पाणी पट्टीचा दर होणार निश्चित

योजनेचा खर्च भागविण्यासाठी पाणी पट्टी आकारण्यात येणार असून, यासाठीचा दर निश्चित होणार आहे. घरगुती, बिगर घरगुती, संस्थात्मक नळजोडणी धारकांसाठी दर निश्चित होणार आहे. या दरात आवश्यकतेनुसार वाढ करणे ग्राम पंचायतीस बंधनकारक राहणार असून, याची मािहती मजीप्राने ग्राम सभेत द्यावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...