आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाळापूर व अकाेला तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या ६९ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेला शिंदे-फडणवीस सरकारकडून स्थगिती दिल्याच्या विराेधात मंगळवारी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन केले. पाण्यासाठी पायपीट कराव्या लागणाऱ्या महिलांनीही आंदाेलनात सहभाग नाेंदवला. हे आंदाेलन या याेजनेसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) नेतृत्वात करण्यात आले. या आंदाेलनात ६९ गावांमधील दाेन हजारांवर ग्रामस्थ सहभागी झाले हाेते.
या वेळी नेते व ग्रामस्थांनी भाजपवर टीका करत आगामी िनवडणुकीत धडा शिकवण्याचा इशाराच िदला. दरम्यान या आंदाेलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील गर्दी-मंडपामुळे वाहतुकीची काेंडी झाली हाेती. तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात बाळापूर तालुक्यातील ५३ गावे व अकोला तालुक्यातील १६ गावे अशा एकूण ६९ गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर केली. मात्र काही िदवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतरही त्यांनी याेजना स्थगित ठेवण्याचा आदेश दिल्याने धरणे आंदाेलन करण्यात आले. या आंदाेलनात शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथाेड, माजी आमदार गजानन दाळू , जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर, अतुल पवनीकर, िवकास पागृत, राहुल कराळे, राजेश मिश्रा, दिलीप बाेचे, अनिरुद्ध देशमुख, उमेशआप्पा भुसारी, उपस्थित होते.
असे केले आंदाेलन
आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर िशवसेनेने ६९ गावांत बैठका घेतल्या हाेत्या. त्यामुळे ग्रामस्थांची संख्या लक्षात घेता आंदाेलनासाठी ४ हजार चाैरस फुटाचा मंडप टाकला हाेता. जिल्हाधिकारी कार्यालय ते सरकारी बगीच्याकडे जाणारा व दाेन्ही मुख्यद्वारामधील एक मार्ग वाहतुकीसाठी बंद केला हाेता. याच मार्गावर मंडप टाकलेले हाेते. आंदाेलनात सहभागी ग्रामस्थांनी याेजनेला स्थगिती दिल्याने सरकारविराेधात घाेषणा दिल्या. आंदाेलकांसाठी चहा-फराळ, पाण्याची व्यवस्था करण्यात आली. आंदाेलनानंतर शिवसैनिकांनी िजल्हाधिकारी कार्यालयसमाेर स्वच्छता अभियानही राबवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.