आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाळापूर तालुक्यातील पारस येथे मंदिरालगतच्या शेडवर रविवारी रात्री झाड कोसळल्याने ७ जण ठार झाले, तर २६ जखमी झाले. पारस येथील महात्मा फुले विद्यालयाजवळ समर्थ बाबुजी महाराज संस्थानात रविवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी आरती झाल्यानंतर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे काही जण सुरक्षेसाठी या परिसरातील शेडखाली थांबले. मात्र या शेडवर कडुनिंबाचे माेठे झाड काेसळल्याने त्यात उभे असलेले सुमारे ५० च्या वर भाविक-ग्रामस्थ अडकले. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बाळापूर-पारस मार्गावर झाडे उन्मळून पडल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला हाेता. जखमींना रुग्णवाहिका व अन्य वाहनांनी रुग्णालयात हलवण्यात आले. ग्रामस्थ, पाेलिस व अन्य सरकारी यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी बचावकार्यासाठी सरसावले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.