आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळवारी २ मे राेजी रात्री पूर्व वैमनस्यातून दोन गटांत दंगल उसळली होती. त्या वेळी झालेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले होते. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत दंगेखोरांची धरपकड सुरू केली होती.
यामध्ये रात्री उशिरापर्यंत दहा आरोपींना पोलिसांनी अटक करीत बुधवारी ३ मे राेजी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने नऊ जणांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला रिमांड होममध्ये पाठवण्यात आले.
झमझम स्टोअर्स आणि शंकर नगर परिसरात मंगळवारी रात्री दोन भागातील काही तरुणांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर दंगल उसळली. या दंगलीत दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करून कंपाऊंडच्या गेटवर आणि संकुलातील घरांचे दरवाजे खिडक्यांना लक्ष्य करत घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली होती.
यादरम्यान अकोट फैल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र कदम यांच्यासह शहरातील इतर पोलिस स्टेशन प्रभारी यांनी आपल्या पथकासह धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दंगेखोरांच्या शोधात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू असताना पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली. या आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना शुक्रवार ५ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी सर्व आरोपींवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक नितीन सुशिर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
या दंगेखोरांना केली अटक
पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी सकाळी दहा आरोपींना अटक केली. शेख रईस शे.राशीद, अजय रमेश राऊत, सो.खान अझर खान, दर्शन सूरज उजैनवाल, स्वप्नील बसवंत वानखडे, विनोद नागोराव पुंडगे, नागेश भरत भगत, मो.शाकीर ए.राशीद, शे.साबीर शे.ताबीद यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला रिमांड होममध्ये पाठवण्यात आले. तर सचिन मुकुंद बलखंडे हा सध्या फरार आहे. पोलिसांनी या आरोपींविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२३,३२४, ३३७, ५०४, ४२७ सह कलम ४,२५आर्म अॅक्ट, सह कलम फौजदारी दुरुस्ती कायदा कायद्यान्वये या आरोपींसह अन्य ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.