आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयाबीन:बाजार समितीत 7,578 क्विंटल सोयाबीनची आवक

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढत आहे. गुरुवारी २७ ऑक्टोबर रोजी नवीन सोयाबीनची खरेदी सुरू झाली आहे. गेल्या ९ दिवसात शुक्रवारी, ४ नोव्हेंबरला बाजार समितीमध्ये सर्वाधिक ७ हजार ५७८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे.

अकोल्यासह जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील सोयाबीन विक्रीसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत आहे. पहिल्या दिवशी १६१९ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. सरासरी भाव हा ४ हजार ४८५ रुपये होता. त्यानंतर पुढे बुधवार २ नोव्हेंबरपर्यंत सरासरी भावात किरकोळ वाढ झाली आहे. गुरुवार ३ व शुक्रवार ४ नोव्हेंबरला सरासरी ५ हजार रुपये क्विंटल भाव मिळाला आहे.

सध्या रब्बी हंगामातील पेरण्यांची लगबग असल्याने शेतकरी गरजेपुरते सोयाबीन विकत आहेत. त्यामुळे अनेक मोठ्या शेतकऱ्यांनी भाव वाढण्याच्या अपेक्षेने सोयाबीन राखून ठेवले आहे. तर निव्वळ गरजेपुरते सोयाबीन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणले आहे.

बातम्या आणखी आहेत...