आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपट्टी‎ उत्पन्नाचे साधन:महापालिकेकडून आर्थिक वर्षात‎ 7.70 कोटींची पाणीपट्टी वसूल‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका पाणीपुरवठा विभागाने चालु‎ आर्थिक वर्षात ७ कोटी ७० लाख ३१ हजार‎ १७० रुपयांची पाणीपट्टीची वसुली केली. मात्र‎ अद्यापही कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी‎ नागिरकांकडे थकीत आहे.‎ महापालिकेचे मालमत्ता करानंतर पाणीपट्टी‎ हे उत्पन्नाचे साधन आहे. मात्र पाणीपट्टी‎ वसुलीकडे गेल्या दोन वर्षांपासून दुर्लक्ष होत‎ आहे. पाणीपट्टी देयक वितरणाचे काम‎ महापालिका कर्मचारी करतात. यासाठी‎ नळाचे रिडींग घेणे, रिडिंग देयके तयार‎ करणाऱ्या कंपनीला देणे आणि देयके घेवून‎ वितरीत करणे, अशी जबाबदारी व्हॉल्वमन,‎ फिटर यांना करावी लागते.‎ दरम्यान देयके तयार करणाऱ्या कंपनीचे‎ देयक थकल्याने कंपनीने देयक तयार‎ करण्याचे काम बंद केले होते. त्यामुळे‎ नागरिकांना पाणीपट्टीची देयकेच मिळाली‎ नाहीत. त्यामुळे पाणीपट्टी वसुली ठप्प झाली‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ होती.

गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा पाणीपट्टी‎ देयक तयार करण्याचे काम कंपनीने सुरू केले‎ आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे पाणीपट्टीची‎ वसुली मंदावली.‎ ४२ हजार नळांना मीटर‎ महापालिका क्षेत्रात एकूण ७१ हजार ८०० वैध‎ नळजोडण्या आहेत. यापैकी ४२ हजार ४३३‎ नळधारकांनी नळांना मीटर लावले आहे. तर‎ २९ हजार ३६७ नळांना अद्यापही मीटर‎ लावलेले नाही. तसेच अद्यापही हजारो‎ नळजोडण्या अवैध आहेत.‎

अद्याप ७ कोटी पाणीपट्टी थकीत‎ महापालिकेला वर्षाकाठी १२ ते १५ कोटी रुपये‎ पाणीपट्टी अपेक्षित आहे. आतापर्यंत ७ कोटी‎ रुपये पाणीपट्टी वसुल झाली असली तरी‎ अद्याप महापालिकेला ७ कोटी रुपये थकीत‎ पाणीपट्टीची वसुली करावी लागणार आहे.‎