आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्प साठवण:काटेपूर्णा प्रकल्पात 77.15 टक्के साठा; 80 टक्के साठा झाला की दरवाजे उघडणार

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात साठवण क्षमतेच्या ७७.१५ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ३१ जुलैच्या आत जलसाठा ८० टक्क्यांच्या वर गेल्यास प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागणार आहेत. काटेपूर्णा प्रकल्पाची साठवण क्षमता ८६.३५ दलघमी. आहे.

या प्रकल्पावर जिल्ह्याची आर्थिक उलाढाल अवलंबून असते. यावर्षी जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने विशेषत: वाशीम, मेडशी, मालेगाव परिसरात फारसा पाऊस न झाल्याने काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली नव्हती. मात्र जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली. नियमानुसार जुलै अखेरपर्यंत प्रकल्पात ८० टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा झाल्यास प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागतात.

प्रकल्पात तूर्तास ६६.६७ दलघमी. (७७.१५ टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. पाऊस थांबला असला तरी पाण्याची आवक काही प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पातील साठा ८० टक्क्यांवर गेल्यास प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागतील. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पाच्या जलसाठ्यातही वाढ झाली आहे.

असा ठेवला जातो साठा
३१ जुलैपर्यंत - ८० टक्के
१ ते १५ ऑगस्ट - ८५ टक्के
१५ ते ३१ ऑगस्ट - ९५ टक्के

बातम्या आणखी आहेत...