आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:दिवसभरात 8 पॉझिटिव्ह; 5 डिस्चार्ज

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात बुधवारी, २९ जूनला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणी आरटीपीसीआरचे १९२ अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये एकूण आठ रुग्णांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिॉटिव्ह आला आहे.

बाधित रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. तर दिवसभरात पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या ३६ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह अहवालांची संख्या ६५२९३ झाली आहे. सद्यःस्थितीत सक्रीय रुग्णांपैकी नऊ जण रुग्णालयात दाखल तर अन्य २७ रुग्ण हे गृह अलगीकरणात आहेत.