आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोरदार पाऊस:पश्चिम विदर्भात साठवण क्षमतेच्या 80 टक्के जलसाठा ; 14 प्रकल्प 100 टक्के

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम विदर्भात साठवण क्षमतेच्या ८०.२४ टक्के जलसाठा झाला आहे. तर २७ मध्यम प्रकल्पांपैकी १४ प्रकल्प १०० टक्के भरले असून मोठ्या प्रकल्पातही मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे.

अकोला जिल्ह्यात दोन, अमरावती जिल्ह्यात एक, यवतमाळ तसेच बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येकी दोन असे एकुण ९ मोठे प्रकल्प आहेत. तर २७ मध्यम प्रकल्प आहेत. त्याच बरोबर २७५ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून ३१०८.७७ दलघमी साठवण क्षमता उपलब्ध झाली आहे. तर तूर्तास २७४३.२२ दलघमी (८८.२४ टक्के) जलसाठा उपलब्ध झाला आहे. यावर्षी जून महिन्यात पावसाने दडी मारली मात्र जुलैच्या अखेरीस पश्चिम विदर्भात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. जुलै महिन्याच्या अखेरीस काही प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले. तर ऑगस्टच्या प्रारंभीही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुबलक जलसाठा झाला. पावसामुळे काही भागातील शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे नुकसान झाले. मात्र जलसाठ्यामुळे रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. तूर्तास मोठ्या प्रकल्पांपैकी चार, तर मध्यम प्रकल्पांपैकी १८ प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

१४ मध्यम प्रकल्प १०० टक्के : यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, नवरगाव. अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, मोर्णा, उमा. वाशीम जिल्ह्यातील सोनल, एकबुर्जी. बुलडाणा जिल्ह्यातील पलढग, मस, कोराडी, उतावळी हे १४ मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.

बातम्या आणखी आहेत...