आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या काही वॉर्डांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत असल्याने खाटा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे रुग्णांना फरशीवर गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहेत. सध्या उपलब्ध खाटांच्या तुलनेत आवश्यक मनुष्यबळ नसल्याने खाटा वाढवाव्या कशा? खाटा वाढवल्याच तर रुग्णसेवा कुणी द्यावी? या प्रश्नांमुळे रुग्णांना अवहेलना सामोरे जावे लागत आहे. सरकारं येतात नि जातात पण या समस्येकडे लक्ष द्यायला कुणी तयार नाही, असा संताप रुग्णांच्या नातेवाइकांनी ‘दिव्य मराठी’कडे मांडला.सर्वोपचार रुग्णालयात गुंतागुंतीच्या प्रसुती, शस्त्रक्रिया, सर्पदंश, श्वानदंश, विषबाधा, अपघात, जळीत रुग्ण,
पदभरती आवश्यक
नर्सेस आणि वर्ग चारचा स्टाफ नसल्याने वॉर्ड वाढविणे शक्य नाही. नर्सिंगची भरती शासन स्तरावर प्रलंबित आहेत. तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती जिल्हा नियोजन समितीच्या स्तरावर होणार आहे. परिचारिकांची सरासरी १५० पदे रिक्त आहेत. पदभरतीसाठी पाठपुरावा सुरू आहे. डॉ. मीनाक्षी गजभीये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला
मेडिसिन वॉर्डांमध्ये दुप्पट गर्दी
सर्वोपचार रुग्णालयातील मेडिसिनचे वॉर्ड क्रमांक पाच, सहा, सात, अतिदक्षता विभाग वॉर्ड क्रमांक आठ, वॉर्ड क्रमांक नऊ या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक राहत आहे. बहुतांश वॉर्ड चाळीस खाटांचे आहेत. मात्र कधीकधी दुप्पट रुग्ण दाखल होतात. वॉर्डात जागा नाही म्हणून रुग्णाला परत पाठवता येत नाही त्यामुळे जागा मिळेल तिथे गादी टाकून दाखल करून घेतले जाते असे परिचारिका सांगतात.
मनुष्यबळ पुरवणे गरजेचे
अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांतून अकोला जीएमसीमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अगदी साध्या प्रसुती, लहान शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया, अपघाताचे रुग्णही जीएमसीमध्ये संदर्भित करण्यात येत असल्याने खाटा कमी पडत आहेत. अनेक वॉर्डात एका खाटेवर दोन रुग्णांना उपचार घ्यावे लागतात. अतिरिक्त खाटांची व्यवस्था व्हावी यासाठी नवीन इमारत बांधण्याची गरज आहे. नुसती इमारत बांधून किंवा खाटांची संख्या वाढवून फायदा नाही. तर त्यासाठी आवश्यक तृतीय आणि चतूर्थश्रेणी मनुष्यबळ पुरवणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.