आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेक्टरचे नुकसान:परतीच्या पावसाने 81 हजार हेक्टरचे  नुकसान; भरपाईस हवेत 119 काेटी

अकाेला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑक्टाेबरमध्ये अतिवृष्टी व संततधार पावसाने १ लाख ८०,६७१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, नुकसान भरपाईसाठी ११९ काेटी ६२ लाख २९ हजार अपेक्षित आहेत. काेरडवाहू, बागायती व फळ पिकांचे नुकसान झाले असून, याचा फटका १ लाख २९०५२ शेतकऱ्यांना बसला आहे. याबाबतचा कृषी, महसूल व जिल्हा परिषद या तीन यंत्रणांचा संयुक्त अहवाल साेमवारी शासनाला पाठवला आहे. यंदा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस झाला.

३० वेळा अतिवृष्टी
जिल्ह्यात यंदा ५२ पैकी २४ मंडळांमध्ये ३० वेळा अतिवृष्टी झाली असून, याचा परिणाम पिकांवर झाला आहे. यात बाळापूर तालुक्यातील पाच, अकाेला- ३, मूर्तिजापूर- २, दाेन अकाेट-४ बार्शीटाकळी- २ आणि तेल्हारा तालुक्यातील सहा मंडळांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...