आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात झालेल्या सत्तांतरानंतर दुसऱ्यांदा थेट सरपंचपदासह २६५ ग्रामपंचायतींच्या सदस्यत्वासाठी रविवारी १८ डिसेंबरला अंदाजे ८१.५ टक्के मतदान झाले. यंदा प्रथमच जिल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने मतदानापूर्वीच सरपंचपदाचे उमेदवार जाहीर केले हाेते. त्यामुळे अध्यक्षा, उपाध्यक्ष, चारही सभापतींसह पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
या निवडणुकीत एकूण १ हजार ७३२ जागांसाठी ४ हजार ८०३ उमेदवार रिंगणात हाेते. एकूण ३ लाख ७ हजार ६४० मतदारांपैकी अंदाजे २ लाख ४९ हजार ३३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या हाेत्या. तर काही ठिकाणी सकाळी अल्प प्रतिसाद हाेता. दुपारनंतर मात्र मतदारांची गर्दी वाढली हाेती. गत दाेन वर्ष काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी काही दिवस निर्बंध हाेते.
तालुकानिहाय येथे हाेणार मतमाेजणी
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी मतमाेजणी हाेणार आहे. ही प्रक्रिया तेल्हारा येथे नवीन तहसील कार्यालय, गाडेगाव रोड. अकोटला नवीन तहसील इमारत, पोपटखेड रोड. मूर्तिजापूरला नवीन शासकीय धान्य गोदाम. अकोला येथे शासकीय धान्य गोदाम, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर. बाळापूरला शासकीय धान्य गोदाम. बार्शीटाकळीत पंचायत समिती सभागृह आणि पातूर येथील तहसील कार्यालयात मतमाेजणी हाेणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.