घरगुती बियाणे:अकोल्यात शेतकर्यांच्या बियाणे महोत्सव पाच दिवसात 8 हजार 216 क्विंटल बियाण्याची विक्री
अकोल्यामध्ये कृषी विभाग व पालकमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना घरगुती बियाणे स्वस्त दरात उपलब्ध व्हावे, तसेच बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडील बियाणे विक्री करता यावे, यासाठी बियाणे महोत्सव राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित महोत्सवाचा सोमवारी 6 जूनला अखेरचा दिवस आहे. आतापर्यंत (दि.५) 16679 क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 8216 क्विंटल बियाणे विक्रीतून एकूण 23 कोटी 68 लाख 7 हजार रुपयांची खरेदी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांतप्पा खोत यांनी दिली.
तालुकानिहाय बियाणे विक्री
- अकोला तालुक्यात 3897.50 क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 1543.75 क्विंटल बियाणे विक्रीतून 5 कोटी 5 लाख 70 हजार रुपये.
- बार्शीटाकळी तालुक्यात 5855 क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 3240 क्विंटल बियाणे विक्रीतून 7 कोटी 84 लाख रुपये
- मुर्तिजापूर तालुक्यात 1345 क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 625.25 क्विंटल बियाणे विक्रीतून 1 कोटी 97 लाख 3 हजार रुपये
- पातूर तालुक्यात 1692.50 क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 880 क्विंटल बियाणे विक्रीतून 2 कोटी 93 लाख 50 हजार रुपये
- बाळापूर तालुक्यात 912.50 क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 331.50 क्विंटल बियाणे विक्रीतून 1 कोटी 24 लाख 40 हजार रुपये
- तेल्हारा तालुक्यात 1889.50 क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 1172.25 क्विंटल बियाणे विक्रीतून 3 कोटी 6 लाख 18 हजार रुपये
- अकोट तालुक्यात 1087.50 क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 423.75 क्विंटल बियाणे विक्रीतून 1 कोटी 57 लाख 27 हजार रुपये असे एकूण 16679.50 क्विंटल बियाण्याचे बुकिंग झाले असून 8216.50 क्विंटल बियाणे विक्रीतून एकूण 23 कोटी 68 लाख 7 हजार रुपयांची खरेदी झाली आहे, अशी माहिती कृषि विभागाद्वारे कळविण्यात आली आहे.