आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतविृष्टीने पिकांची हानी:जिल्ह्यात 32 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 9 कोटी 60 लाख जमा; जिल्ह्यात 1 लाख 80 हजार शेतकरी बाधित

अकोला3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

अतविृष्टी व ढगफुटीसदृश्य पावसाने जुलै महिन्यात झालेल्या पिक नुकसानासाठीची वाढीव मदत तहसीलदारांच्या खात्यात वळती करण्यात आली असली तरी आतापर्यंत बाधित १ लाख ८० हजार शेतकऱ्यांपैकी ३२,३९२ शेतकऱ्यांच्या खात्यात ९ कोटी ६० लाख जमा झाले आहेत. १ लाख २२ हजार ४५६.८७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या वाढीव मदतीसाठी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला ३९ कोटी ३० रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. नुकसान भरपाई वितरण अकोला तालुका सर्वात मागे आहे.

जिल्ह्यात जुलैत अतविृष्टी-ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. शासनाने सोमवारी वाढीव दराने मदत जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्याला ३९ कोटी ३० लाख रुपये मंजूर झाले आहेत. जुलै महिन्यात १ लाख २२ हजार ४५६.८७ हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित झाल्याने यापूर्वीच ८४ कोटी ३६ लाख रुपयांची मदत मंजूर झाली होती. ही मदतही संबंधित शेतकऱ्यांना वितरीत झाली आहे. दरम्यान शासनाच्या महसूल व वन विभागाने वाढीव दराने मदत जाहीर केली. या मदतीचे तालुकानिहाय वितरण करण्यात आले आहे.

तहसीलदारांच्या खात्यात वळता निधी
तालुका वळती केलेली रक्कम

 • अकोला १५ कोटी ३१ लाख ५३ हजार
 • बार्शीटाकळी ७ कोटी ६४ लाख ७४ हजार
 • अकोट १ कोटी ८६ लाख ८९ हजार
 • तेल्हारा ७० लाख १८ हजार
 • बाळापूर ६ कोटी ८८ लाख ३५ हजार
 • पातूर ६ कोटी ६९ लाख ३ हजार
 • मूर्तिजापूर २० लाख २३ हजार

असे झाले होते नुकसान

 • जुलै महिन्यातील अतविृष्टीमुळे १ लाख २१ हजार २९५.३६ हेक्टरवरील कोरडवाहू पिकांचे नुकसान झाले होते. त्याचा फटका ८२४ गावांमधील १ लाख ७८ हजार ८३ शेतकऱ्यांना बसला होता.
 • ५७९.१८ हेक्टरवरील बागायती नुकसान झाले होते. या फटका २०० १ हजार ४१ शेतकऱ्यांना बसला होता.
 • जिल्ह्यातील २०४ गावांतील ५८२.३३ हेक्टरवरील फळ पिके सुद्धा पावसाने बाधित झाली होती. परिणामी ९०९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

अशी आहे वितरणाची स्थिती

 • सर्व तहसील खात्यात ३९ कोटी लाख रुपये जमा झालेले आहेत. कोषागारात ४५ हजार ५१८ शेतकऱ्यांची यादी सादर करण्यात आली आहे.
 • ३२ हजार ३९२ शेतकऱ्यांच्या खात्यात ९ कोटी ६० लाख रुपये जमा झाले असून, जमा झालेल्या अनुदानाची टक्केवारी ३६ आहे.
 • अद्यापही तहसील कार्यालयाच्या खात्यात २५ कोटी ५ लाख रुपये शिल्लक आहेत.

अशी मिळतेय वाढीव मदत
कोरडवाहूसाठी १० हजार, बागायतीसाठी १५ हजार आणि फळ पिकांचे नुकसान झाले असल्यास प्रती हेक्टरी २५ हजारांची मदत मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...