आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 काेटी 8 लाख वसूल:लाेकअदालतीत  9 हजार 76 प्रकरणे निकाली; 26 काेटी 8 लाख वसूल

अकाेला5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयाेजन करण्यात आले. सर्व न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ३९ हजार ८०८ प्रकरणे लोकअदालतींमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. एकूण १ हजार ४२२ प्रलंबित प्रकरणात व ७ हजार ६५४ दाखलपूर्व प्रकरणात समेट घडला. एकूण ९ हजार ७६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तडजोडी अंती २६ कोटी ८ लाख १८ हजार ३४९ रुपयांची वसुली झाली, अशी माहिती जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी दिली. तर ग्रामीण भागातील पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यासाठी थकबाकीदारांनीही न्यायालय परिसरात धाव घेतली हाेती.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार १२ नोव्हेंबर रोजी जिल्हयातील सर्व दिवाणी व फौजदारी न्यायालये तसेच कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक

या प्रकरणांमध्ये घडला समेट
समेट घडलेल्या प्रकरणांमध्ये मुख्यत्वे दिवाणी, फौजदारी स्वरूपाची, मोटार वाहन अपघात प्रकरण व कलम १३८ एन. आय. अॅक्ट तसेच ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी व महानगरपालिकेची कर वसुली व बी.एस.एन.एल. व बँकांच्या खटलापूर्व प्रकरणांचा समावेश हाेता.

थकबाकीदारांसाठी पं. स. निहाय टेबल
घरपट्टी, पाणी पट्टी थकल्याने थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आली हाेती. यासाठी संबंधित ग्रामपंचायतने केस दाखल केली. त्यानंतर लोकअदालतीमध्ये थकबाकीदारांसाठी पंचायत समितीनिहाय टेलबची व्यवस्था करण्यात आली. दर्शनी भागावर माहितीचा फलकही हाेता.

५९ हजार ४२९ जणांना बजावली नोटीस
पाणी पुरवठा योजनांची पाणीपट्टी आिण आणि घरपट्टीचा अदा न केलेल्या ५९ हजार ४२९ जणांना ग्रामपंचायतींमार्फत नोटीस बजावण्यात आल्यानंतर अनेकांनी शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये धाव घेतली हाेती. या प्रकरणांचा निपटारा व्हावा, यासाठी केसेस लोक अदालतीमध्ये सादर करण्यात आली. संबंधित कर्मचारी थकबाकीदारांना थकबाकीबाबत माहिती समजून सांगत हाेते. त्यामुळे अनेकजण तडजोडीसाठी तयार झाले.

बातम्या आणखी आहेत...