आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खत नागरिकांना वाटप:अकोल्यात ९  टन निर्माल्य संकलन;  निर्माल्यातून होणार खतनिर्मिती

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला शहरात विविध सामाजिक संस्थांकडून पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी निर्माल्याची योग्य विल्हेवाट, मूर्तीचे कृत्रिम टँकमध्ये विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील नीलेश देव मित्रमंडळाच्या वतीने यंदा शहरात निर्माल्य रथ फिरवण्यात आला. उपक्रमातून ९ टन निर्माल्य संकलन करण्यात आले. याचे खत तयार करून हे खत नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे.

यंदा मंडळाकडून घरोघरी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी शाडू मातीच्या श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्याचे आवाहन करण्यात आले. श्रींच्या शाडू मातीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी ६३५ निसर्ग व पर्यावरणपूरक कुंड्यांचे वितरण नीलेश देव मित्र मंडळामार्फत करण्यात आले. उपक्रमाला प्रतिसाद देत न्यू तापडिया नगर, जठारपेठ, प्रसाद कॉलनी, गड्डम प्लॉट, रामदास पेठ, तापडिया नगर, जुने शहर या भागात या पर्यावरणपूरक कुंड्यांमध्ये नागरिकांनी गणेशाचे विसर्जन केले. या उपक्रमात स्थानिक नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. नागरिकांना अनंत चतुर्दशीच्या दिवशी पर्यावरण पूरक माझा बाप्पा माझ्या घरी राहणार व माझ्यासह सर्वांना जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन देणार आणि जलप्रदूषण मुक्तीसाठी सहकार्य करणारा हा उपक्रम यंदा यशस्वी ठरल्याचे यावेळी नीलेश देव मित्र मंडळाचे प्रमुख नीलेश देव यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...