आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षीच्या मुलावर केला होता अत्याचार:आरोपीला 20 वर्षांची शिक्षा; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नऊ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी खटला न्यायालयात चालला. सुनावणी दरम्यान पीडित मुलगा व त्याची आई न्यायालयाला फितूर झाले. मात्र, वैद्यकीय अहवाल व डीएनए अहवाल पॉझीटीव्ह आला. हाच पुरावा ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरवत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल बुधवारी दिला. आकाश अशोक खोडे (वय ३० वर्ष रा. पातूर) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर २०१८ रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास नऊ वर्षाचा मुलगा बाहेर खेळायला जातो म्हणून घरून निघून गेला होता. बाहेर गेल्यानंतर दोघे जण उभे होते. त्यापैकी एकाने तूला पंतग काढून देतो असे म्हणून बाजूला नेले आणि तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर साडेसात वाजता मुलगा रडत रडत घरी आला. त्याने आईला सांगितले असता आरोपीचा शोध घेऊन त्याच्याविरूद्ध पातूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी आरोपी आकाश अशोक खोडे याच्याविरूद्ध भांदविचे कलम ३७७, पोक्सोचे कलम ३,४, नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास केल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. तसेच प्रकरणामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकिल शितल भुतडा यांनी गुन्हा सिद्ध होण्याकरीता १२ साक्षीदार तपासले.

सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकर यांच्या न्यायालयाने आरोपी अकाश अशोक खोडे याला कलम ३,४ पोक्सो कायदा सह कलम ३७७ भादंवि अंतर्गत दोषी ठरवून २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व १० हजार रूपये दंड अशी शिक्षा, तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली. सदर खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील शितल भुतडा यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. तसेच पैरवी अधिकारी म्हणून हेकॉ. रत्नाकर बागडे, तपास अधीकारी पीएआय व्ही.एस. महाले यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...