आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन घर किंवा जागा विकत घेताना फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. अशीच घटना खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. घर विकत घेण्यासाठी एका फ्लॅटचा सौदा ९० लाख रुपयांमध्ये केला. त्यानंतर ३० लाख रुपये देऊन इसारपावती केली. मात्र, ताबा देण्यास टाळाटाळ करण्यात आले. नंतर मात्र, ज्या फ्लॅटचा सौदा केला केला होता ती बिल्डिंगच बिल्डरने परस्पर विकून टाकली. या प्रकरणी पोलिसांनी आता संबंधित बिल्डरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अनिलकुमार जागनमल चंदवाणी (रा. सिंधी कॅम्प कच्ची खाली) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भजनलाल लेखराजमल पारवाणीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अनिलकुमार यांचे स्वत:चे घर नसल्याने ते भाड्याच्या घरात राहत होते. त्यानंतर स्वत:चे घर विकत घेण्यासाठी त्यांनी ओळखीतील बिल्डरचा शोध सुरु केला. एके दिवशी चंदवाणी हे ओळखीतील बांधकाम व्यावसायिक साक्षी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे पारवाणी यांच्याकडे घर खरेदीसाठी गेले.
पारवाणी यांनी मूळ मालक संजय लोढीया यांच्याकडून लिहून घेतलेला प्लॉट विकासाचा करारनामा दाखवून बांधकाम करत असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील एक फ्लॅट दाखवला. भजनलाल पारवाणीसोबत त्या फ्लॅटचा सौदा चंदवाणी यांनी ९० लाखांत केला. त्यानंतर इसार रक्कम म्हणून २०१७-१८ मध्ये ३० लाख रुपये नगदी स्वरूपात दिले. त्यानंतर पूर्ण इमारत बांधून झाल्यावर उर्वरित ६० लाख रुपये देण्याचे ठरले होते.
काही दिवसानंतर या इमारतीचे बांधकाम थांबल्याने चंदवाणी यांनी पारवाणीला विचारले असता ते टाळाटाळ करू लागले. नंतर त्या इमारतीचे कामच थांबवण्यात आले. चंदवाणी यांनी पैसे परत देण्याचे म्हटले असता त्यांना वाशीम बायपास येथील खुली जागा दाखवली व ती घेण्याचे सांगितले. मात्र चंदवाणी यांनी त्या जागेसंदर्भात माहिती काढली असता जी जागा दुसऱ्याच्या नावावर दिसून आली. त्यामुळे त्यांनी ती जागा घेण्यास नकार दिला. चंदवाणी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर खदान पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी भजनलाल पारवाणीविरुद्ध भादंविचे कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.
नंतर कळले की इसार केलेली इमारत विकली
चंदवाणी यांनी पारवाणी यांना पैसे परत मागितले. दरम्यानच्या काळात त्यांना कळले की ज्या इमारतीमधील फ्लॅटचा सौदा केला होता ती इमारतच विकली आहे. तक्रारीत त्यांनी असेही म्हटले की पारवाणीने अनेक लोकांकडून पैसे घेतलेले आहेत. तसेच त्यांच्यावर १३८ च्या केसेससुद्धा कोर्टात सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.